'सितारे जमीन पर'च्या सेटवर शाहरुखची सरप्राइज एन्ट्री, किंग खानला पाहताच मुलांनी केली 'ही' खास गोष्ट

By देवेंद्र जाधव | Updated: June 19, 2025 10:53 IST2025-06-19T10:52:39+5:302025-06-19T10:53:01+5:30

'सितारे जमीन पर' च्या सेटवर शाहरुख खान आल्याने सर्वांना मजा आली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आनंदी व्हाल

Shahrukh Khan gave a special surprise to the children of the movie Sitare Zameen Par | 'सितारे जमीन पर'च्या सेटवर शाहरुखची सरप्राइज एन्ट्री, किंग खानला पाहताच मुलांनी केली 'ही' खास गोष्ट

'सितारे जमीन पर'च्या सेटवर शाहरुखची सरप्राइज एन्ट्री, किंग खानला पाहताच मुलांनी केली 'ही' खास गोष्ट

आमिर खानच्या आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमाची खूप उत्सुकता आहे. या सिनेमात आमिर खान प्रमुख भूमिकेत आहेच शिवाय या सिनेमात १० नवोदित कलाकार दिसणार आहेत. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे. अशातच 'सितारे जमीन पर' सिनेमाच्या सेटवरुन एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने सिनेमातील सर्व कलाकारांना खास सरप्राइज दिलं आहे. त्यामुळे सर्वांच्या आनंदाला उधाण आलं.

शाहरुखने 'सितारे जमीन पर'च्या सेटला दिली ग्रेट भेट

आमिर खानने त्याच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत  'सितारे जमीन पर'चं शूटिंग सुरु असतं. पुढे अचानक शाहरुखची एन्ट्री होते. शाहरुख आल्यामुळे सर्वांनाच मोठं सरप्राइज मिळतं. आमिर खानलाही आनंद होतो. तो शाहरुखला मिठी मारतो. शाहरुख सिनेमातील सर्व मुलांना भेटतो. सर्व त्याला मिठी मारतात. सिनेमातील सर्व मुलं शाहरुखसमोर त्याचे डायलॉग बोलतात. शाहरुख सर्वांना दाद देतो. शेवटी आमिर आणि सर्व मुलांसोबत शाहरुख फोटो काढतो. अशाप्रकारे शाहरुखच्या एन्ट्रीने  'सितारे जमीन पर'च्या सेटवर आनंदाचं वातावरण दिसलं.

'सितारे जमीन पर' उद्या रिलीज होणार

आमिर खानला ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.  ‘सितारे जमीन पर’ सिनेमा उद्या २० जूनला देशभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात १० नवोदित कलाकार अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा विशेष सहभाग आहे. आमिर - जिनिलीया या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

 

Web Title: Shahrukh Khan gave a special surprise to the children of the movie Sitare Zameen Par