शाहरुखच्या मन्नतमध्ये डिलिव्हरी बॉय बनून घुसण्याचा प्रयत्न; पण समोर आलं भलतंच सत्य! व्हिडीओ बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:04 IST2025-08-20T12:58:03+5:302025-08-20T13:04:54+5:30

किंग खानला भेटण्यासाठी चाहत्याचा अनोखा जुगाड; डिलिव्हरी बॉय बनून गेला पण, घडलं असं काही...

shahrukh khan fan attempt to enter mannat by becoming a delivery boy but the truth came out video viral | शाहरुखच्या मन्नतमध्ये डिलिव्हरी बॉय बनून घुसण्याचा प्रयत्न; पण समोर आलं भलतंच सत्य! व्हिडीओ बघाच

शाहरुखच्या मन्नतमध्ये डिलिव्हरी बॉय बनून घुसण्याचा प्रयत्न; पण समोर आलं भलतंच सत्य! व्हिडीओ बघाच

Shahrukh Khan Fan:बॉलिवूड किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता शाहरुख खानचा जगभरात चाहतावर्ग आहे.शाहरुख खान त्याच्या चित्रपटांशिवाय लाईफस्टाईलमुळे देखील चर्चेत असतो. त्याची फक्त एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. शिवाय  शाहरुख खान राहत असलेला मन्नत बंगला देखील कुतुहलाचा विषय आहे. किंग खानला भेटता यावं यासाठी चाहते नानविध प्रयोग करत असतात. अलिकडेच त्याच्या एका माथेफिरु चाहत्याने थेट मन्नतमध्ये  घुसण्याचा प्रयत्न केला होता. अशातच नुकताच शाहरुख खानच्या एका जबरा फॅनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काय आहे  या व्हिडीओमागचं सत्य जाणून घेऊया...

शाहरुख खानला भेटण्यासाठी शुभम प्रजापत नावाच्या चाहत्याने चक्क डिलीव्हरी बॉय बनून मन्नतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.मात्र, त्याचा हा प्लॅन शाहरुखच्या गार्डने हाणून पाडला. दरम्यान, सोशल मीडियावर 'Madcap alive' या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सुरुवातीला हा इन्फ्ल्यूएन्सर तो मन्नतच्या बाहेर उभा राहतो आणि शाहरुखला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो.पण,सुरक्षा रक्षक त्याला आत जाऊ देत नाहीत.त्यानंतर हा चाहता दोन कोल्ड कॉफी ऑर्डर करतो, एक स्वतःसाठी आणि एक 'किंग खान'च्या नावाने. ऑर्डर आल्यावर, शुभम खऱ्या डिलिव्हरी एजंटकडून बॅग घेतो आणि स्वतःला डिलिव्हरी बॉय बनून शाहरुखच्या घरात मागच्या गेटने जाण्याचा प्रयत्न करतो.मात्र, मागच्या गेटवर जेव्हा गार्ड त्याला ऑर्डर देणाऱ्या व्यक्तीचा नंबर डायल करण्यास सांगतात तेव्हा त्याचा गोंधळ उडतो आणि प्लॅन फसतो. मन्नतमध्ये जाऊन शाहरुखला भेटण्याची ही आशा घेऊन आलेल्या शुभमच्या हाती निराशाच लागते.


सध्या,सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.अनेकांनी या इन्फ्ल्यूएन्सरच्या धाडसाचं आणि कौतुक केलं आहे.या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलंय की,"भावाने त्याच्या मेंदूचा पुरेपूर वापर केला...".तर अनेकांनी मन्नतच्या सुरक्षारक्षकाचं कौतुक केलंय.

Web Title: shahrukh khan fan attempt to enter mannat by becoming a delivery boy but the truth came out video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.