किंग खानची मुलगी सुहानाचा फोटो पुन्हा एकदा आला चर्चेत, फॅन्स करताहेत कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 06:00 IST2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:00+5:30

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूखचा मुलगी सुहाना खान बऱ्याचदा फोटो व व्हिडिओमुळे चर्चेत असते.

Shahrukh Khan Daughter Suhana Khan Photo From Her College Viral On Social Media | किंग खानची मुलगी सुहानाचा फोटो पुन्हा एकदा आला चर्चेत, फॅन्स करताहेत कौतूक

किंग खानची मुलगी सुहानाचा फोटो पुन्हा एकदा आला चर्चेत, फॅन्स करताहेत कौतूक

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूखचा मुलगी सुहाना खान बऱ्याचदा फोटो व व्हिडिओमुळे चर्चेत असते. नुकताच सुहाना खानने काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो सुहानाच्या फॅन क्लबवर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत सुहाना आपल्या दोन मैत्रिणींसोबत दिसत आहेत. सुहानाने लाईट मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.  

सुहानाच्या या फोटोला ७ हजारांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. या फोटोमध्ये सुहाना सुंदर दिसते आहे. चाहते तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. काही दिवसांपूर्वी सुहानाचा कॉलेजमधील एक फोटो समोर आला होता. या फोटोमुळे सुहाना ट्रोल झाली होती. सुहानाचे कपडे व पोझवरून तिला ट्रोल करत आहेत. 


एका युजरने सांगितलं की, एवढं शो ऑफ नको करूस, जर नॉर्मल कपडे परिधान करशील तर जास्त सुंदर दिसशील.


तर दुसऱ्या युजरनं म्हटलं की, सुहाना तुझा ड्रेस नीट कर. तर आणखीन एकाने लिहिलं की, तू शाहरूख खानची मुलगी आणि तुला असे शो ऑफ करण्याची गरज नाही. नॉर्मल रहा. सुहानावर ट्रोलिंग व कमेंट्सचा काहीच परिणाम होत नाही.


नुकतेच सुहानाने ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. शाहरूख आणि गौरीने लेकीच्या ग्रॅज्यूएशन सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुहानाने लंडनच्या Ardingly Collegeमधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केले.  तिला कॉलेज कडून तिला विशेष पुरस्कारही देण्यात आला. सुहाना कॉलेजमधील ड्रामा अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत असे आणि तिच्या या योगदानसाठी तिला कॉलेजकडून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा होतेय. ती कधी डेब्यू करते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पण तूर्तास सुहाना शिकतेय आणि शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय बॉलिवूड करिअर नाही, हे तिच्या डॅडने तिला कधीच सांगितले आहे.
 

Web Title: Shahrukh Khan Daughter Suhana Khan Photo From Her College Viral On Social Media