वारंवार सोशल मीडियावर पाहिला जातोय शाहरुख खानची लेक सुहानाचा फोटो, दिसतेय क्युट..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 13:46 IST2020-12-11T13:41:40+5:302020-12-11T13:46:52+5:30

सुहान पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड फॅनफॉलोईंग आहे.

Shahrukh khan daughter suhana khan latest photo viral on social media | वारंवार सोशल मीडियावर पाहिला जातोय शाहरुख खानची लेक सुहानाचा फोटो, दिसतेय क्युट..

वारंवार सोशल मीडियावर पाहिला जातोय शाहरुख खानची लेक सुहानाचा फोटो, दिसतेय क्युट..

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. किंग खानची मुलगी सुहाना खानदेखील वडिलांसारखी सोशल मीडियावरील लोकप्रिय सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. सुहाना तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करत असते. त्याचबरोबर चाहत्यांना देखील तिचे फोटो खूप आवडतात. सुहाना तिच्या एका नव्या फोटोला घेऊन चर्चेत आली आहे. 

सुहाना खानने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये सुहाना तिच्या मैत्रिणीसोबत दिसतेय आहे. सुहाना तिच्या खास मैत्रिणीलाही खूप मिस करते आहे. याच कारणामुळे फोटो शेअर करताना  त्याने कॅप्शनमध्ये लिहिले 'मिस यू ...'. सुहानाने यात प्रिंटेड टॉप आणि डेनिम घातली आहे ज्यात ती खूप क्युट दिसतेय. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

शाहरुखची लेक सुहान पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड फॅनफॉलोईंग आहे.  सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे.2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहरुखने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या.

Web Title: Shahrukh khan daughter suhana khan latest photo viral on social media