शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:12 IST2025-05-12T16:10:59+5:302025-05-12T16:12:15+5:30
'किंग' सिनेमात कोणाची एन्ट्री?

शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी 'किंग' (King) सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. नुकतंच मेट गाला सोहळ्यात शाहरुखने गळ्यात K चं लॉकेट घातलं होतं. या माध्यमातून त्याने किंगचंच प्रमोशन केलं. सिनेमात अभिषेक बच्चन, सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभय वर्माही यांचीही भूमिका आहे. तर आता या स्टारकास्टमध्ये आणखी एका स्टारचं नाव समोर आलं आहे. तोही सिनेमात महत्वाची भूमिका निभावणार आहे. कोण आहे तो अभिनेता?
१९९५ साली आलेला 'त्रिमूर्ती' आठवतोय? या सिनेमात शाहरुख खान, जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर तिघेही मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर अनिल कपूर आणि शाहरुख एकत्र दिसले नाहीत. मात्र आता शाहरुखच्या 'किंग' मध्ये अनिल कपूरची एन्ट्री झाली आहे. पिंकव्हिला रिपोर्टनुसार, अनिल कपूर यामध्ये शाहरुखचा मार्गदर्शक असणार आहे. तब्बल ३० वर्षांनंतर त्यांची एकाच सिनेमात वर्णी लागली आहे. अनिल कपूर-शाहरुखला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
'किंग' सिनेमा पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात रिलीज होईल असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताबाहेर सिनेमाचं शूट सुरु होतं . तर आचा २० मे पासून याचं मुंबई शेड्युल सुरु होणार आहे. यानंतर पुन्ह युरोपमध्ये काही भाग शूट होणार आहे. शाहरुख आणि दीपिका रोमँटिक भूमिकेत दिसणार आहेत. सिद्धार्थ आनंद सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.