टॉमी सिंगच्या अवतारात शाहिदचे वर्कआउट !
By Admin | Updated: April 25, 2016 03:17 IST2016-04-25T03:17:29+5:302016-04-25T03:17:29+5:30
अ भिषेक चौबे यांच्या आगामी ‘उडता पंजाब’मधील शाहिद कपूरचा रॉकस्टार लूक सर्वांचे लक्ष आकर्षित करत आहे. त्याचा क्रेझी, ओटीटी, ड्रगी अवतार सध्या युथमध्ये लाइक केला जात आहे.

टॉमी सिंगच्या अवतारात शाहिदचे वर्कआउट !
अ भिषेक चौबे यांच्या आगामी ‘उडता पंजाब’मधील शाहिद कपूरचा रॉकस्टार लूक सर्वांचे लक्ष आकर्षित करत आहे. त्याचा क्रेझी, ओटीटी, ड्रगी अवतार सध्या युथमध्ये लाइक केला जात आहे. लग्नानंतरच्या शाहिदच्या दोन चित्रपटांकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे. ते म्हणजे, ‘उडता पंजाब’ आणि ‘रंगून’. जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, तेव्हा सर्वांनी ट्रेलरचे कौतुक केले. शाहिदने त्याची उत्सुकता आणि आनंद त्याच्या फॅन्ससोबत शेअर केला आहे. त्याने त्याचे सेक्सी, हॉट फोटोसेशन सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केले आहे. त्याने त्याच्या वर्कआउट सेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने या फोटो कोलाजला कॅप्शन दिले आहे की, ‘ए मिली ए मिली ए मिली.’ या चित्रपटात शाहिद कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर खान, दिलजित दोसंघ हे मुख्य भूमिकेत असतील, तर चित्रपट १७ जून रोजी प्रदर्शित होईल.