शाहिद-मीरा रोमँटिक लंच डेटवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 14:31 IST2016-11-29T14:31:36+5:302016-11-29T14:31:36+5:30

शाहिद कपूर आणि मीरा कपूर राजपूत जोडपं आता सध्या पालकाच्या भूमिकेत आहे. मुलगी मीशा म्हणजे शाहिदसाठी जीव की प्राण! ...

Shahid-Meera romantic lunch date ... | शाहिद-मीरा रोमँटिक लंच डेटवर...

शाहिद-मीरा रोमँटिक लंच डेटवर...

ref="http://cnxmasti.lokmat.com/bollywood/did-you-know/shahid-kapoor-start-shooting-of-padmavati/14335">शाहिद कपूर आणि मीरा कपूर राजपूत जोडपं आता सध्या पालकाच्या भूमिकेत आहे. मुलगी मीशा म्हणजे शाहिदसाठी जीव की प्राण! शाहिद कितीही बिझी असला तरीही तो त्याची लाडकी लेक मीशासाठी वेळ काढतोच. फक्त त्याला वर्कलोड आणि मीशा यांच्यामुळे  मीरासाठी वेळ काढता येत नाही, अशी तक्रार स्वत: मीरानेच केली आहे.

                   

अलीकडेच शाहिद तिला खास लंच डेटवर घेऊन गेला. तिथे त्यांना ‘बी टाऊन’ च्या फोटोग्राफर्सनी गाठले. मग काय? शाहिद-मीरा त्यांच्या लंच डेटवर कसे दिसत होते इथपासून ते त्यांनी काय खाल्ले इथपर्यंत सर्व बाबींच्या चर्चेला उधाण आले. यावेळी हे जोडपं अत्यंत कुल लुकमध्ये दिसतं होतं. शाहिदने कॅज्युअल ग्रे कलरचा टी-शर्ट, काळ्या रंगाचे शॉर्ट्स आणि गॉगल घातलेला होता. तर मिसेस मीरा कपूर ही पांढºया रंगाचा टॉप, निळ्या रंगाची जेगिन्स घातलेली होती. 

                                                   

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर हे जोडपं ‘बी टाऊन’चं सर्वांत हॉट कपलपैकी एक मानले जाते. मीशाच्या जन्मावेळी शाहिदने कामातून सुट्टया घेतल्या होत्या. त्यावेळी त्याला जास्तीत जास्त क्षण मीरासोबत घालवायचे होते. मीशाच्या जन्मानंतर अवघ्या तीन मिनिटांत त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली. आजपर्यंत त्याने मीशाचा चेहरा मीडियासमोर येऊ दिला नाही. ‘बाप-लेकी’चे हे प्रेम ‘बी टाऊन’साठी काही नवीन नाही. पण, त्याचे चाहते मात्र मीशाचा चेहरा पाहण्यास नक्कीच उत्सुक असतील. शाहिद सध्या बहुचर्चित चित्रपट ‘पद्मावती’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी तो विशेष मेहनत घेताना दिसतोय.

                                          
                                           लंच डेटवरून रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना शाहिद-मीरा.

                                       

Web Title: Shahid-Meera romantic lunch date ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.