शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत पुन्हा प्रेग्नेंट?, बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 12:51 IST2020-08-26T12:51:17+5:302020-08-26T12:51:38+5:30

मीराने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेल्या फोटोत तिचा बेबी बंप दिसत आहे.

Shahid Kapoor's wife Meera Rajput pregnant again ?, photo of baby bump floating goes viral | शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत पुन्हा प्रेग्नेंट?, बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो होतोय व्हायरल

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत पुन्हा प्रेग्नेंट?, बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो होतोय व्हायरल

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी म्हणजे शाहिद कपूरमीरा राजपूत. मीरा ही सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. पण स्टाईलमध्ये ती बॉलिवूडच्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. मीराचे बऱ्याचदा सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताना दिसत असतात. नुकताच मीराने स्वत:चा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. या फोटोत मीरा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते आहे. त्यामुळे नेटकरी विचार करत आहेत की 'मीरा पुन्हा प्रेग्नेंट आहे का?'

मीराने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेल्या फोटोत तिचा बेबी बंप दिसत आहे. या फोटोत तिने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा एक साधा सूट घातला आहे आणि ती स्वत: देखील खूप साधी दिसत आहे. फोटोत मीराचे डोळे मिटलेले आहेत, पण ती कॅमेर्‍याकडे तोंड करून किस करत आहे. आता हा फोटो पाहून तुम्हाला देखील हा प्रश्न पडेल की, मीरा पुन्हा प्रेग्नेंट आहे का? मात्र तसे नाही. ती प्रेग्नेंट नाही. तिचा हा जुना फोटो आहे, जेव्हा ती पहिल्यांदा प्रेग्नेंट होती आणि मीशाचा जन्म झाला होता. मीराने स्वत: याबद्दल सांगितले आहे.

हा फोटो शेअर करत मीराने लिहिले की, 'प्रसूतीच्या एक दिवस अगोदर #4yearsagotoday. मला हे समजू शकते की पोट वाढत होते पण नाकाचे काय झाले होते, ते का वाढत होते?

मीराच्या या फोटोवर चाहत्यांचा आधी गोंधळ उडाला, पण कॅप्शन वाचल्यानंतर सर्वांना समजले की हा जुना फोटो आहे. शाहिद आणि मीराला मुलगी मीशा आणि मुलगा झेन अशी दोन मुले आहेत.

Web Title: Shahid Kapoor's wife Meera Rajput pregnant again ?, photo of baby bump floating goes viral