शाहिद कपूरच्या ‘या’ हॉट फोटोवर मीरा राजपूतने दिली मजेशीर प्रतिक्रिया!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 15:53 IST2017-07-08T10:23:20+5:302017-07-08T15:53:20+5:30

अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत बॉलिवूडमधील असे कपल आहे, जे वेळोवेळी त्यांच्यातील प्रेम व्यक्त करताना दिसतात. ...

Shahid Kapoor's 'Hot' photo by Mira Rajput gave a funeral reaction !! | शाहिद कपूरच्या ‘या’ हॉट फोटोवर मीरा राजपूतने दिली मजेशीर प्रतिक्रिया!!

शाहिद कपूरच्या ‘या’ हॉट फोटोवर मीरा राजपूतने दिली मजेशीर प्रतिक्रिया!!

िनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत बॉलिवूडमधील असे कपल आहे, जे वेळोवेळी त्यांच्यातील प्रेम व्यक्त करताना दिसतात. कालच शाहिद आणि मीराच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. परंतु दोघेही त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असल्याने त्यांनी वाढदिवस ग्रॅण्ड नव्हे तर साध्या पद्धतीने सेलिब्रेट केला. असो, शाहिद आणि मीरामधील केमिस्ट्री आम्ही वेळोवेळी तुम्हाला दाखविली आहे. दोघे ज्या पद्धतीने एकमेकांना समजून घेतात, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. याचेच दर्शन घडविणारी एक बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ही बातमी वाचून तुमच्या चेहºयावर नक्कीच हास्य फुलेल. 
 
वास्तविक शाहिदने सोशल मीडियावर त्याचा एक हॉट फोटो शेअर केला आहे. शाहिदने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये शाहिद आरशासमोर शर्टलेस अवतारात उभा असल्याचे दिसतो. फोटोमध्ये शाहिद खूपच हॉट दिसत असून, शाहिदचे सिक्स पॅक अ‍ॅब्स प्रेमात पाडणारे आहेत. मग त्याची पत्नी मीराला हा फोटो धक्का देणारा नसेल तरच नवल. तिने जेव्हा शाहिदचा हा फोटो बघितला तेव्हा तिला कंट्रोल करणे अशक्य झाले. तिने लगेचच या फोटोवर कमेण्ट दिली. मात्र तिची ही कमेंट चेहºयावर हास्य फुलविणारी आहे. मीराने कमेण्टमध्ये म्हटले की, ‘फेव्हर फेव्हर काम चालू हैं’! मीराचे हे कमेण्ट दोघांमधील केमिस्ट्री दर्शविणारे आहे. 



असो, जर तुम्हाला या दोघांनी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा केला हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. या कपलच्या अतिशय जवळच्या सूत्राने सांगितले की, दोघेही शूटिंगमध्ये व्यस्त राहणार असल्याने त्यांनी वाढदिवसाबाबत कुठल्याही प्रकारचे खास प्लॅनिंग केले नव्हते. अतिशय साध्या पद्धतीने त्यांनी लग्नाचा दुसरा वाढदिवस सेलिब्रेट केला. 

Web Title: Shahid Kapoor's 'Hot' photo by Mira Rajput gave a funeral reaction !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.