'पद्मावत'च्या सेटवर शाहिद कपूरचा झालेला अपमान? क्रू मेंबरने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:51 IST2025-01-28T11:47:25+5:302025-01-28T11:51:22+5:30

Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'देवा'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Shahid Kapoor was insulted on the sets of 'Padmaavat'? Crew member tells the story | 'पद्मावत'च्या सेटवर शाहिद कपूरचा झालेला अपमान? क्रू मेंबरने सांगितला किस्सा

'पद्मावत'च्या सेटवर शाहिद कपूरचा झालेला अपमान? क्रू मेंबरने सांगितला किस्सा

अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'देवा'(Deva Movie)च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. देवा हा अॅक्शन पॅक्ड सिनेमा असून ज्यात शाहिद कपूर एक बंडखोर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन एंड्र्यूजने झी स्टुडिओज बॅनर अंतर्गत केले आहे. शाहिदने नुकतेच एका मुलाखतीत बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.

शाहिद कपूरने नुकतेच राज शमानीच्या मुलाखतीत देवा चित्रपटाबद्दल सांगितले आणि त्याचा हा इंटरव्ह्यू चर्चेत आहे. अभिनेत्याने सांगितले की, त्याचा २०१९ चा सुपरहिट चित्रपट 'कबीर सिंग' रिलीज होण्यापूर्वी त्याला कमी लेखले गेले होते. शाहिदने मात्र कोणाचेही नाव घेतले नाही. तथापि, २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाच्या सेटवर तो त्याच्या अनुभवाबद्दल बोलत असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. 'पद्मावत'मध्ये शाहिदने पहिल्यांदा दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर केली होती. पॉडकास्टमधून शाहिदची क्लिप समोर आल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर अनेकांनी आपली मते मांडण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी शाहिदने साकारलेले पात्र रतन सिंगचे कौतुक केले, तर इतरांनी त्याच्या सहकलाकारांना ट्रोल केले.

'पद्मावत'च्या क्रू मेंबरने केला खुलासा

'पद्मावत'मध्ये क्रू मेंबर असल्याचा दावा करणाऱ्या नरेंद्र कुलकर्णीची कमेंट सध्या चर्चेत आहे. त्याने म्हटले की, 'खरंच यार, मी पद्मावतवर काम करत होतो, रणवीर पीक टाईमवर होता आणि शाहिद डाऊन टाइममध्ये होता, रणवीर दुय्यम शॉट्स टाळत होता आणि शाहिद सर्व शॉट्स देत होता.'

'पद्मावत' ६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात होतोय प्रदर्शित
कथित क्रू मेंबरने केलेल्या या दाव्यात काही तथ्य आहे की नाही हे केवळ 'पद्मावत'चे निर्माते आणि स्टार कास्टच पुष्टी करू शकतात. जोपर्यंत याची पुष्टी होत नाही तोपर्यंत ही अफवा आहे. दरम्यान, 'पद्मावत' पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते सज्ज आहेत. ६ फेब्रुवारीला हा चित्रपट पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
 

Web Title: Shahid Kapoor was insulted on the sets of 'Padmaavat'? Crew member tells the story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.