शाहिद कपूर एकदम कबीर सिंग मोडमध्ये, पापाराझींवर अचानक का भडकला?, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 01:14 PM2023-09-03T13:14:23+5:302023-09-03T13:34:11+5:30

व्हिडिओमध्ये शाहीद पापाराझींवर संतापलेला दिसत आहे.

Shahid Kapoor suddenly in Kabir Singh mode, why did he suddenly lash out at the paparazzi?, video viral | शाहिद कपूर एकदम कबीर सिंग मोडमध्ये, पापाराझींवर अचानक का भडकला?, व्हिडिओ व्हायरल

Shahid Kapoor

googlenewsNext

अभिनेता शाहीद कपूर बॉलिवूडमध्ये चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. नुकताच त्याचा बेधडक अंदाज नेटकऱ्यांना पहायला मिळाला. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहीद पापाराझींवर संतापलेला दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी शाहिद कपूर याच्यासोबत त्याची पत्नी मीरा राजपूत ही देखील दिसत आहे. त्याचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधतोय.

शाहिद कपूर हा पत्नी मीरा राजपूत आणि आपल्या कुटुंबासह एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी  शाहिद आणि त्याची पत्नी मीरा राजपूत रस्त्यावर उभे राहून कारची वाट पाहत होते. यावेळी पापाराझी त्याला आवाज देताना दिसले. त्यांचे ओरडणे हे शाहिद कपूर याला अजिबात आवडले नाही. यावेळी शाहिदने पापाराझींना चांगलेच सुनावले. तो म्हणला की, "पागलसारखे का ओरडत आहात? मी इथेच उभा आहे ना? मी गाडीत जाऊन बसलो तर ओरडा. आता तुमच्या समोरच आहे ना मी. जरा रिलॅक्स."  

हा व्हिडिओ समोर आल्यावर काहींनी शाहीदचे समर्थन केलंय तर काहींनी यावर टीका केली आहे.  एका युजरने लिहिले, “आज भाऊ कबीर सिंह मूडमध्ये आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “त्याने अगदी बरोबर केले". 

शाहीदच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा ब्लडी डॅडी चित्रपटात दिसला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला चाहत्याच्या पंसतीस पडला. याशिवाय शाहिद लवकरच क्रिती सेननसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. सध्या तरी या चित्रपटाचे नाव समोर आलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिसेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज करण्याची तयारी सुरू आहे.
 

Web Title: Shahid Kapoor suddenly in Kabir Singh mode, why did he suddenly lash out at the paparazzi?, video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.