शाहिद कपूरने शेअर केला मुलगी मीशासोबतचा क्युट फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 13:01 IST2019-02-02T12:55:41+5:302019-02-02T13:01:44+5:30

शाहिद कपूर आणि मिरा राजपूत यांची  मुलगी मीशा कपूर बॉलिवूडमधल्या चर्चित स्टार किड्सपैकी एक आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात

Shahid kapoor shared a picture on instagram with daughter meesha kapoor | शाहिद कपूरने शेअर केला मुलगी मीशासोबतचा क्युट फोटो!

शाहिद कपूरने शेअर केला मुलगी मीशासोबतचा क्युट फोटो!

ठळक मुद्देशाहिद कपूरने मीशा सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहेफोटोत दोघे एका बाईकवर बसलेले दिसतायेत.   

शाहिद कपूर आणि मिरा राजपूत यांची  मुलगी मीशा कपूर बॉलिवूडमधल्या चर्चित स्टार किड्सपैकी एक आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. शाहिद कपूरने नुकताच मीशा सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोत दोघे एका बाईकवर बसलेले दिसतायेत.   


सध्या शाहिद कपूर त्याचा आगामी सिनेमा 'कबीर सिंह'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. शूटिंगमधून वेळ काढून तो कुटुंबांसोबत कॉलिटी टाईपसेंट करताना दिसतोय. मीशा सोबतचा फोटो शाहिदने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत मीरा खूप गोड दिसतेय. 


 कबीर सिंहबाबत बोलायचे झाले तर हा सिनेमा २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे. ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक असलेला हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित करत आहेत. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपटही संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केलेला आहे. यात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता. काही दिवसांपूर्वीच शाहिदने ‘कबीर सिंग’च्या चित्रीकरणास सुरूवात केली. या चित्रपटात शाहिद वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहिद या चित्रपटात एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे.  यात त्याचे चार लूक पाहायला मिळणार आहेत   शाहिद सोबत या चित्रपटात कियारा आडवाणी दिसणार आहे.  या चित्रपटाच्या निमित्ताने कियारा, शाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. शाहिदचे चाहते 'कबीर सिंग' चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

Web Title: Shahid kapoor shared a picture on instagram with daughter meesha kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.