शाहिद कपूरचा Email लीक! खासगी गोष्टी झाल्या व्हायरल, सुरक्षितेतवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 18:03 IST2024-04-17T17:54:39+5:302024-04-17T18:03:20+5:30

शाहिदचा ईमेल लीक झाला आहे. या ईमेलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याच्या ट्रॅव्हल्स प्लान्सची माहिती आहे.

shahid kapoor personal email gets leaked actors travel plans and hotel details | शाहिद कपूरचा Email लीक! खासगी गोष्टी झाल्या व्हायरल, सुरक्षितेतवर प्रश्नचिन्ह

शाहिद कपूरचा Email लीक! खासगी गोष्टी झाल्या व्हायरल, सुरक्षितेतवर प्रश्नचिन्ह

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. शाहिदचा ईमेल लीक झाला आहे. या ईमेलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याच्या ट्रॅव्हल्स प्लान्सची माहिती आहे. यामुळे गोपनियता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

या व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये शाहिदचा २३ एप्रिल ते १६ मे दरम्यानचा ट्रॅ्व्हल प्लॅन आहे. या दिवसांत शाहिद कधी, कुठे आणि कोणत्या फ्लाइटने जाणार? याबाबत माहिती देण्यात आली आहे. २३ एप्रिलला शाहिद मुंबईहून  दिल्लीला रवाना होणार आहे. त्यानंतर तो विमानाने टोक्योला जाणार आहे. २७ ला सिडनी आणि ३० एप्रिलला न्यूयॉर्कला जाणार असल्याची माहिती या ईमेलमध्ये आहे. त्यानंतर पॅरिस, मग पॅरिसहून इस्तंबूल आणि मग अबू धाबूची सैर केल्यानंतर शाहिद मुंबईत परतणार आहे. यामध्ये त्याच्या ट्रॅव्हल प्लॅन्सबरोबरच तो कोणत्या हॉटेलमध्ये थांबणार याबाबतही माहिती देण्यात आली आहे. 

शाहिदच्या ट्रॅव्हल प्लॅनचा हा फोटो नेमका कुणी लीक केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण, हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी शाहिदबाबतची ही वैयक्तिक माहिती लीक केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. याबाबत अद्याप शाहिद कपूरने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Web Title: shahid kapoor personal email gets leaked actors travel plans and hotel details