​‘जब वी मेट’नंतर शाहिद कपूरचा पुन्हा एकदा इम्तियाज अलीला होकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 15:23 IST2017-10-31T09:53:52+5:302017-10-31T15:23:52+5:30

दहा वर्षांपूर्वी आलेला करिना कपूर आणि शाहिद कपूर या एकेकाळच्या लव्हबर्ड्सचा ‘जब वी मेट’ हा चित्रपट कमालीचा गाजला होता.  ...

Shahid Kapoor once again Imtiaz Ali, after 'Jab We Met' | ​‘जब वी मेट’नंतर शाहिद कपूरचा पुन्हा एकदा इम्तियाज अलीला होकार!

​‘जब वी मेट’नंतर शाहिद कपूरचा पुन्हा एकदा इम्तियाज अलीला होकार!

ा वर्षांपूर्वी आलेला करिना कपूर आणि शाहिद कपूर या एकेकाळच्या लव्हबर्ड्सचा ‘जब वी मेट’ हा चित्रपट कमालीचा गाजला होता.  चुलबुली गीत आणि साधा-भोळा आदित्य  आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहेत. कदाचित म्हणूनच ‘जब वी मेट’चे दिग्दर्शक इम्तियाज अली  शाहिदसोबत पुन्हा एकदा काम करण्यास उत्सुक आहे. केवळ उत्सूकच नाही तर हा चित्रपट मार्गी लागल्याचीही खबर आहे. शाहिदने म्हणे इम्तियाजच्या आगामी चित्रपटाला होकारही दिला आहे. 
  ‘जब वी मेट’नंतर इम्तियाज पुन्हा एकदा शाहिदसोबत एक अनोखी लव्हस्टोरी पे्रक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. तूर्तास या चित्रपटाबद्दल फार खुलासा झालेला नाही पण लव्हस्टोरी म्हटल्यानंतर हा ‘जब वी मेट’चा दुसरा भाग तर नसेन ना, याबद्दलच्या तर्कवितर्कांना सध्या ऊत आला आहे. चर्चा खरी मानाल तर, ‘जब वी मेट’प्रमाणेच इम्तियाजचा हा आगामी चित्रपट एक रोमॅन्टिक कॉमेडी असणार असणार आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये देश-विदेशातील सुंदर लोकेशन्सवर याचे शूटींग सुुरू होणार आहे.  अर्थात या चित्रपटात हिरोईन कोण असणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कारण शाहिदच्या अपोझिट त्याच्याच तोडीची हिरोईन इम्तियाजला हवी आहे. त्यामुळे या चित्रपटात शाहिदच्या अपोझिट कुणाची वर्णी लागते, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार  आहे.

ALSO READ: ‘जब वी मेट’ची दशकपूर्ती ! असे झाले होते शूटींग!!

‘जब वी मेट’मध्ये शाहिद कपूरने आदित्य कश्यप नावाच्या मुलाची भूमिका साकारली होती. अर्थात त्याच्यापेक्षा करिनाने साकारलेल्या भूमिकेला अधिक प्रसिद्धी मिळाली होती. पण शाहिदनेही या चित्रपटात अप्रतिम अभिनय केला होता. सध्या शाहिद ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात शाहिद कपूर हा महारावल रतनसिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. इम्तियाजचे म्हणाल तर, त्याचे अनेक चित्रपट एकापाठोपाठ अपयशी ठरत आहेत. अलीकडे आलेला त्याचा ‘जब हॅरी मेट सेजल’ दणकून आपटल्याने इम्तियाजला एका हिटची गरज आहे. शाहिद कपूरसोबतच्या आगामी चित्रपटाने त्याची ही गरज पूर्ण होवो, अशी अपेक्षा करूयात!


 

Web Title: Shahid Kapoor once again Imtiaz Ali, after 'Jab We Met'