शाहिद कपूरचे फॅन आहात? नाना पाटेकरांसोबतचा सिनेमा ओटीटीवर झालाय रिलीज, वीकेंडला अजिबात चुकवू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:45 IST2026-04-10T11:45:11+5:302026-04-10T11:45:35+5:30

शाहिद कपूरचा अॅक्शन सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित, वीकेंडला बघूनच टाका

shahid kapoor o romeo movie released on prime video ott | शाहिद कपूरचे फॅन आहात? नाना पाटेकरांसोबतचा सिनेमा ओटीटीवर झालाय रिलीज, वीकेंडला अजिबात चुकवू नका

शाहिद कपूरचे फॅन आहात? नाना पाटेकरांसोबतचा सिनेमा ओटीटीवर झालाय रिलीज, वीकेंडला अजिबात चुकवू नका

शाहिद कपूरच्या ‘ओ रोमियो’ सिनेमाची खूप चर्चा रंगली होती. व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर १३ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. आता दोन महिन्यांतच शाहिद कपूरचा ‘ओ रोमियो’ ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्राइम व्हिडिओवर शुक्रवारी(१० एप्रिल) ‘ओ रोमियो’ प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट आता भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांत प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. 

१९९४ मधील अस्थिर बॉम्बेच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘ओ’ रोमियो’ची कथा उस्तरा नावाच्या धोकादायक गुंडाभोवती फिरते, जो गुप्तपणे गुप्तचर अधिकारी इस्माईल खान यांच्यासाठीही काम करतो. त्याचे नवे मिशन त्याला दहेश दुग्गल या वित्तपुरवठादाराविरुद्ध उभे करते, ज्याचे संबंध स्पेनमध्ये बसलेल्या गुंड जलालशी आहेत. मात्र कथा तेव्हा नवे वळण घेते, जेव्हा त्याची भेट अफशानशी होते—एक अशी विधवा जी आपल्या प्रियकर बिल्लूच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पेटलेली आहे. हिंसा आणि निष्ठेवर आधारलेले हे मिशन हळूहळू भावनांच्या धोकादायक संघर्षात बदलते, जिथे प्रेम, विश्वासघात आणि जगण्यासाठीची लढाई एकमेकांत मिसळते.


विशाल भारद्वाज यांची वैशिष्ट्यपूर्ण कथनशैली, मुंबईतील माफिया जगतातील खरी घटनांची प्रेरणा, प्रभावी दृश्यरचना, दमदार अ‍ॅक्शन आणि लक्षवेधी अभिनय, तसेच गुलजार यांच्या संगीताने सजलेला ‘ओ’ रोमियो’ हा केवळ अ‍ॅक्शनपट न राहता प्रेम आणि वर्चस्वाच्या शोधात घेतलेल्या निर्णयांची मानवी किंमतही दाखवतो. विशाल भारद्वाज यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. चित्रपटात शाहिद कपूर, तृप्ती डिमरी आणि अविनाश तिवारी प्रमुख भूमिकांत दिसतात. यांच्यासोबत नाना पाटेकर, तमन्ना भाटिया, दिशा पाटनी आणि फरीदा जलाल महत्त्वाच्या भूमिकांत आहेत, तर विक्रांत मॅसी विशेष उपस्थितीत दिसणार आहेत.

Web Title : शाहिद कपूर की 'ओ रोमियो' नाना पाटेकर के साथ अब ओटीटी पर

Web Summary : 1994 बॉम्बे की पृष्ठभूमि पर आधारित शाहिद कपूर की 'ओ रोमियो' अब प्राइम वीडियो पर है। फिल्म एक खतरनाक गैंगस्टर के बारे में है और प्रेम, विश्वासघात और अस्तित्व के विषयों की पड़ताल करती है। फिल्म में नाना पाटेकर, तृप्ति डिमरी और अविनाश तिवारी भी हैं।

Web Title : Shahid Kapoor's 'O Romeo' Now on OTT with Nana Patekar

Web Summary : Shahid Kapoor's 'O Romeo', set against the backdrop of 1994 Bombay, is now on Prime Video. The film follows a dangerous gangster and explores themes of love, betrayal, and survival. The movie also stars Nana Patekar, Trupti Dimri and Avinash Tiwary.