शाहिदने खरेदी केली Mercedes-Maybach GLS 600; किंमत ऐकून दीपतील डोळे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 12:07 PM2023-12-20T12:07:56+5:302023-12-20T12:08:57+5:30

Shahid kapoor : गेल्याच वर्षी 2022मध्ये शाहिदने मर्सिडीज Maybach S580 ही कार खरेदी केली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एक नवीन मर्सिडीज विकत घेतली.

shahid-kapoor-mira-rajput-buy-new-luxury-car-worth-crores-take-a-look-at-his-car-collection | शाहिदने खरेदी केली Mercedes-Maybach GLS 600; किंमत ऐकून दीपतील डोळे

शाहिदने खरेदी केली Mercedes-Maybach GLS 600; किंमत ऐकून दीपतील डोळे

बॉलिवूडचा कबीर सिंह म्हणजे अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. गेल्या काही काळापासून शाहिद लागोपाठ सुपरहिट सिनेमा देत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी मर्सिडीज गाडी खरेदी करणाऱ्या शाहिदने यावर्षी 2023 मध्ये पुन्हा एकदा एक नवी कोरी कार खरेदी केली आहे. 

शाहिदने 2022 मध्ये मर्सिडीज Maybach S580  ही कार खरेदी केली होती. या गाडीची किंमत जवळपास 2.8 कोटी रुपये इतकी आहे. त्यानंतर आता त्याने पुन्हा एक नवीन मर्सिडीज खरेदी केली आहे. मेबॅक इंडियाच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवर शाहिदच्या नव्या कारची माहिती देण्यात आली आहे. सोबतच त्यांनी फोटोही शेअर करण्यात आला. 

 शाहिदला कार कलेक्शन करायची विशेष आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक वेगवेगळ्या गाड्या आहेत. याच गाड्यांच्या ताफ्यामध्ये आता मर्सिडीज Maybach या गाडीचा समावेश झाला आहे. शाहिदच्या Mercedes-Maybach GLS 600 या गाडीची किंमत जवळपास 2.96 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. 

शाहिदकडे आहेत या गाड्या

यापूर्वी शाहिदकडे मेबॅक S580, रेंज रोवर वोग, Porsche Cayenne GTS, Jaguar XKR-S आणि मर्सिडीज-AMG S400 या गाड्या आहेत. दरम्यान, अलिकडेच शाहिद फर्जी, ब्लडी डॅडी या सिनेमांमध्ये झळकला. त्यानंतर लवकरच २०२४ मध्ये त्याचा आणखी एक सिनेमा रिलीज होणार आहे.

Web Title: shahid-kapoor-mira-rajput-buy-new-luxury-car-worth-crores-take-a-look-at-his-car-collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.