पहिलं प्रेम, शाहिद समोर होता, पण करिनाने केलं साफ दुर्लक्ष अन्... Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:47 AM2024-02-21T10:47:14+5:302024-02-21T10:50:08+5:30

शाहिद कपूर - करिना कपूर अनेक वर्षांनी एकमेकांसमोर आल्यावर काय घडलं? त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय

Shahid kapoor-Kareena kapoor came face to face in dadasaheb phalke international awards 2024 Video storm viral | पहिलं प्रेम, शाहिद समोर होता, पण करिनाने केलं साफ दुर्लक्ष अन्... Video तुफान व्हायरल

पहिलं प्रेम, शाहिद समोर होता, पण करिनाने केलं साफ दुर्लक्ष अन्... Video तुफान व्हायरल

शाहिद कपूर - करिना कपूर (Shahid Kapoor) हे दोघं बॉलिवूडमधले लोकप्रिय अभिनेते. दोघेही सध्या करिअरच्या शिखरावर आहेत. दोघांचेही सिनेमे सध्या बॉक्स ऑफीसवर चांगलेच गाजत आहेत. शाहिद - करिनाचं अफेअर इंडस्ट्रीमध्ये चांगलंच गाजलं हे सर्वांना माहितच आहे. पुढे दोघांचं ब्रेकअप झालं. आता अनेक वर्षांनी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने शाहिद - करिना (Kareena Kapoor) एकमेकांसमोर आले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. 

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा काल मुंबईत रात्री पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. याच पुरस्कार सोहळ्यात शाहिद कपूर - करिना कपूरने ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली.  शाहिद रेड कार्पेटवर असताना अचानक करिना समोर आली. सुरुवातीला दोघेही एकमेकांसमोर अवघडल्यासारखे दिसले. 

पुढे शाहिदने करिनाला पाहून स्माईल दिली. पण करिना त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसली. शाहिदच्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहून करिना हसली. पण तिने शाहिदची दखल घेतलेली दिसली नाही. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान शाहिद - करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर... शाहिदचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झालाय. तर करिना सध्या कपिल शर्मासोबत आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

Web Title: Shahid kapoor-Kareena kapoor came face to face in dadasaheb phalke international awards 2024 Video storm viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.