शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग'चे शानदार पोस्टर आऊट, फॅन्सनी केला लाईक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 10:53 IST2019-04-22T10:34:08+5:302019-04-22T10:53:55+5:30

शाहिद कपूर सध्या कबीर सिंग सिनेमाला घेऊन चर्चेत आहे, काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीजर रिलीज झाला होता. त्यानंतर आता कबीर सिंगचा पोस्टर आऊट झाला आहे.

Shahid kapoor kabir singh poster release | शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग'चे शानदार पोस्टर आऊट, फॅन्सनी केला लाईक्सचा वर्षाव

शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग'चे शानदार पोस्टर आऊट, फॅन्सनी केला लाईक्सचा वर्षाव

ठळक मुद्देशाहिदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे हा सिनेमा २१ जून २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

शाहिद कपूर सध्या कबीर सिंग सिनेमाला घेऊन चर्चेत आहे, काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीजर रिलीज झाला होता. त्यानंतर आता कबीर सिंगचा पोस्टर आऊट झाला आहे. शाहिदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. ज्यात त्यांने दाढी वाढवलेली दिसतेय. सोशल मीडियावर शाहिदच्या फॅन्सनी या पोस्टरवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

गेल्या वर्षापासून शाहिदनं ‘कबीर सिंग’च्या चित्रीकरणास सुरूवात केली. मुंबई-दिल्लीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडणार आहे. या सिनेमात शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्यांच्या भूमिकेत आपल्या समोर येईल. शाहिदचा या सिनेमात एका वेगळ्याच अंदाज आहे. कबीर सिंग चित्रपटात शाहिद दोन वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. पूर्वार्धात तो महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या भूमिकेत आणि उत्तरार्धात मॅचोमॅनच्या अंदाजात पहायला मिळणार आहे. 

शाहिद कपूरच्या ट्रेनरने सांगितले की, कबीर सिंग चित्रपटासाठी शाहिदला विद्यार्थ्याचा लूक देण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. सेकंड हाफमध्ये त्याच्या बॉडीवर एवढे काम केले की त्याचे थोडे मस्क्यूलर दिसले.

‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं होतं. रिमेकचं दिग्दर्शनही संदीप वांगा करत आहेत.‘कबीर सिंग’मध्ये शाहिदसोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. कबीर सिंगची कथा अशा एका व्यक्तीची आहे जो पेशाने डॉक्टर आहे. पण, थोडा सणकी आहे आणि आदर्शदेखील. हा सिनेमा २१ जून २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Shahid kapoor kabir singh poster release