शाहिद कपूरच्या ‘इश्क विश्क’ची ‘ही’ हिरोईन आठवतेय? जाणून घ्या, ती सध्या काय करते 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 08:00 AM2021-08-28T08:00:00+5:302021-08-28T08:00:02+5:30

‘इश्क विश्क’ हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. सध्या ती कुठे आहे, काय करतेय, कशी दिसते...?

shahid kapoor debut film ishq vishk co-star shenaz treasury then and now | शाहिद कपूरच्या ‘इश्क विश्क’ची ‘ही’ हिरोईन आठवतेय? जाणून घ्या, ती सध्या काय करते 

शाहिद कपूरच्या ‘इश्क विश्क’ची ‘ही’ हिरोईन आठवतेय? जाणून घ्या, ती सध्या काय करते 

googlenewsNext
ठळक मुद्देशेनाज गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडपासून थोडी लांब गेली असली तरी आजही तिचा चार्म कायम आहे. अगदी ‘इश्क विश्क’मध्ये दिसली तशीच ती आजही दिसते.

शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) ‘इश्क विश्क’  (Ishq Vishk) हा सिनेमा पाहिला असेल तर त्यातला एका हिरोईनचा चेहरा तुम्हाला आठवत असेलच. होय, आम्ही बोलतोय ते शेनाज ट्रेजरीवाला (Shenaz Treasury) हिच्याबद्दल. ‘इश्क विश्क’ हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. ही शेनाज अलीकडे बॉलिवूडमधून गायब झालेली दिसतेय. सध्या ती कुठे आहे, काय करतेय, कशी दिसतेय हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक असणारच.

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधी शेनाज टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा होती. एमटीव्हीची व्हिजे अशी तिची ओळख होती. अनेक जाहिरातींमध्येही ती झळकली होती. शिवाय ‘एडूरूलेनी मनिषी’ या तेलगू सिनेमातही तिने काम केले होते. यानंतर तिला ‘इश्क विश्क’ हा सिनेमा मिळाला. यात शेनाज सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेसच्या भूमिकेत दिसली. पण तिची भूमिका लोकांना इतकी आवडली की, त्यावर्षीचा बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेसचा फिल्मफेअर अवार्डही तिने जिंकला होता.

‘इश्क विश्क’नंतर हमतुम, डेल्ही बेली, मुन्ना मायकल अशा सिनेमात ती दिसली. पण तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही. 2001 मध्ये शेनाज अमेरिकेत स्थायिक गेली. अमेरिकेत ‘वन लाइफ टू लिव्ह’ या टीव्ही शोमध्ये तिने काम केले. सुमारे तीन वर्षे या शोमध्ये काम केल्यानंतर ‘ब्राऊन नेशन’ या अमेरिकन कॉमेडी शोमध्येही ती झळकली. यानंतरही बॉलिवूडच्या काही सिनेमात ती झळकली. 2018 मध्ये सैफ अली खानच्या ‘कालाकांडी’ या सिनेमात ती अखेरची झळकली.

शेनाज सध्या काय करतेय तर आता ती ट्रव्हल ब्लॉगर बनलीये. तिच्या इन्स्टा अकाऊंटवर गेलात तर तिचे अख्खे अकाऊंट ट्रॅव्हल व्हिडीओ व फोटोंनी भरलेले तुम्हाला दिसेल. शेनाज गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडपासून थोडी लांब गेली असली तरी आजही तिचा चार्म कायम आहे. अगदी ‘इश्क विश्क’मध्ये दिसली तशीच ती आजही दिसते.

Web Title: shahid kapoor debut film ishq vishk co-star shenaz treasury then and now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.