पती शाहिद कपूरसोबत स्क्रिनवर दिसणार मीरा राजपूत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 10:27 IST2018-07-26T10:25:32+5:302018-07-26T10:27:55+5:30

शाहिदची पत्नी मीरा तशी बॉलिवूडच्या बाहेरची. म्हणजे, बॉलिवूडशी दूरदूरपर्यंत संबंध नसणारी. पण शाहिदची पत्नी होताच, तिने या इंडस्ट्रीशी अलगद जुळवून घेतलं. 

shahid kapoor and mira rajput have been approached to star in an ad film together | पती शाहिद कपूरसोबत स्क्रिनवर दिसणार मीरा राजपूत!

पती शाहिद कपूरसोबत स्क्रिनवर दिसणार मीरा राजपूत!

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांना एकत्र स्क्रीनवर पाहणे कुणाला आवडणार नाही. शाहिदची पत्नी मीरा तशी बॉलिवूडच्या बाहेरची. म्हणजे, बॉलिवूडशी दूरदूरपर्यंत संबंध नसणारी. पण शाहिदची पत्नी होताच, तिने या इंडस्ट्रीशी अलगद जुळवून घेतलं. ग्लॅमर वर्ल्डमधील शाहिदच्या मित्रांसोबत पार्ट्या करण्यापासून, त्याच्यासोबत वेगवेगळ्या इव्हेंटला, अवार्ड फंक्शनला जाण्यापासून तर बड्या मॅगझिनसाठी फोटोशूट करण्यापर्यंत सगळं काही अगदी सहजरित्या तिने स्वीकारलं. लग्न झाल्या झाल्या करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्येही ती शाहिदसोबत आली. अगदी तेव्हापासून मीराच्या अ‍ॅक्टिंग डेब्यूची चर्चा आहे आणि कदाचित त्याची सुरूवात झाली आहे. कालपरवा मीराने एका बेबी प्रॉडक्ट्ससाठी शूट केले आणि आता शाहिद व मीरा दोघेही एका मोठ्या ब्रँडची जाहिरात करताना दिसणार आहेत. होय, एका घरगुती उपकरणांच्या ब्रॅण्डने ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर म्हणून मीरा व शाहिद या जोड़प्याला साईन केल्याचे कळतेय.
सूत्रांचे मानाल तर मीराला कमालीची कॅमेरा फ्रेंडली आहे. कालपरवा एका बेबी प्रॉडक्टसाठी शूट करताना, अगदी पहिल्या टेकमध्ये मीराने सीन पूर्ण केला. ती नवखी आहे, हे सेटवर असलेल्यांना जावणलेदेखील नाही. एकंदर काय तर मीरामध्ये अ‍ॅक्टिंग स्पार्क आहे आणि तो लोकांना जाणवू लागला आहे. त्यामुळे येत्या काळात मीरा बॉलिवूडमध्येही दिसली तर आश्चर्य वाटायला नको.
मीराला २ वर्षांची मुलगी आहे. मीरा लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. ७ जुलै २०१५ रोजी शाहिद व मीराचे लग्न झाले होते. एक वर्षानंतर २६ आॅगस्टला त्यांच्या घरी मीशाचा जन्म झाला.  

 

Web Title: shahid kapoor and mira rajput have been approached to star in an ad film together