कॉफी विद करणमध्ये दिसणार शाहिद आणि मीरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 17:48 IST2016-12-26T17:48:26+5:302016-12-26T17:48:26+5:30

बॉलिवूडचा स्टार शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत पहिल्यांदा ऑनस्क्रीन दिसली. मीरा आणि शाहिद कपूर पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर करण जोहरच्या ...

Shahid and Meera will appear in the coffee breaks | कॉफी विद करणमध्ये दिसणार शाहिद आणि मीरा

कॉफी विद करणमध्ये दिसणार शाहिद आणि मीरा

लिवूडचा स्टार शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत पहिल्यांदा ऑनस्क्रीन दिसली. मीरा आणि शाहिद कपूर पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर करण जोहरच्या कॉफी विद करणमध्ये दिसणार आहेत. शाहिदसुद्धा मुलगी मीशाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच ऑनस्क्रीन दिसणार आहे. नुकताच या एपिसोडचा टीझर रिलीज करण्यात आलायं. या टीझरमध्ये शाहिद आणि मीरा यांची जोडी खूपच सुंदर दिसतेय. शाहिदची ढेकर देण्याची सवय मीरा अजिबात आवडत नसल्याचे ती म्हणालीय. तसेच त्यांच्या एक्स रिलेशनशिपबद्दलही या शोमध्ये चर्चा झाली आहे. टीझरमध्ये मीरा म्हणतेय आम्ही दोघे एकमेकांबद्दल जाणतो यावर शाहिद बोलतो आता मी तुझ्या बॉयफ्रेंडस बद्दलची गुपित उघडी करतो. त्यावर करण बोलतो शाहिदच्या एक्सबद्दल आम्हाला सगळ्यांना माहिती आहेच पण मीरा लग्न आधी तुझे किकी अफेअर्स होते. यावर शाहिदने पटकन उत्तर  दिले माझ्यापेक्षा काही कमी नाहीये. 
 टीझरला बघून या एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असेल असे दिसतेय. पहिल्यांदा कॉफी विद करणच्या निमित्तान शाहिद आणि मीरामधली केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
 
मीरा आणि शाहिद इंस्टाग्राम पोस्टवर नेहमीच दिसतात. मात्र पहिल्यांदा ऑनस्क्रीन दिसणार आहेत. पहिल्यांदा कॉफी विद करणच्या निमित्तान शाहिद आणि मीरामधली केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याआधी शाहिद करिना आणि प्रियांकासोबत आधीच्या सीझनमध्ये करणच्या शोमध्ये दिसला होता. शाहिदचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे. त्याचे आणि करिना कपूरचे नात्याबद्दल तर जगजाहीर होते. करिनानंतर शाहिदचे नाव प्रियांका चोपडाबरोबर पण जोडले गेले होते. तर एक वेबसाईटने दिलेल्या माहिती नुसार मीराचे आदित्य नावाच्या मुलाशी अफेर होते. काहीवेळानंतर दोघांनी वेगळ होण्याचा निर्णय घेतला आणि आदित्य लंडना पुढील शिकण्यासाठी निघून गेला.  


Web Title: Shahid and Meera will appear in the coffee breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.