‘पद्मावती’ च्या सेटवर शाहिदला मीशाची कंपनी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 19:38 IST2016-12-03T19:36:54+5:302016-12-03T19:38:39+5:30

वडील-मुलीचे नातं...मग ते आॅफस्क्रीन असो किंवा आॅनस्क्रिन त्या प्रेमात काही बदल नसतोच. सध्या ‘बी टाऊन’चा चॉकलेट हिरो शाहिद कपूर ...

Shaheed Misha's company on 'Padmavati' set? | ‘पद्मावती’ च्या सेटवर शाहिदला मीशाची कंपनी?

‘पद्मावती’ च्या सेटवर शाहिदला मीशाची कंपनी?

ील-मुलीचे नातं...मग ते आॅफस्क्रीन असो किंवा आॅनस्क्रिन त्या प्रेमात काही बदल नसतोच. सध्या ‘बी टाऊन’चा चॉकलेट हिरो शाहिद कपूर वडीलांच्या भूमिकेतून जात आहे. त्याची मुलगी मीशा ही त्याचा जीव की प्राण आहे. त्याला तिला सोडून शूटिंगला जायला फारच कंटाळा येतो. म्हणून तो मीशाला ‘पद्मावती’ च्या सेटवर घेऊन जातो. तेवढीच त्याला सेटवर मीशाची कंपनीही मिळते. 

शाहिद कपूरने मीराच्या प्रसुतीपूर्वी तीन महिने पितृत्व रजा घेतली होती. त्याचे म्हणणे असे होते की, आमच्या आयुष्यातील एवढ्या महत्त्वाच्या क्षणी मी मीराच्या सोबत असणं गरजेच आहे! यावरूनच कळतेय की शाहिदच्या त्याची मुलगी मीशावर किती जीव आहे ते. ‘पद््मावती’ चे शूटिंग वांद्रे येथील मेहबूूब स्टुडिओत सुरू असून सुट्ट्यानंतर शाहिदला पद्मावतीच्या शूटिंगसाठी जाणे अगदी नकोसे झालेले असल्याने त्याने युक्ती शोधून काढली. ती म्हणजे सेटवर मीशालाही घेऊन जाण्याची. राजा रावळ रतन सिंग याच्या भूमिकेत त्याने मग दीपिकाला घुमर सिक्वेन्ससाठी जॉईन केले. 

सुत्रांनुसार, दीपिका आणि संजय लीला भन्साळी यांना मीशाला भेटण्याची खुप उत्सुकता लागली होती. त्यावेळी घुमर गाण्याचे शूटिंग सुरू होते. कथानकातील हा सर्वांत महत्त्वाचा सीन त्याने मीशाच्या उपस्थितीत शूट केला. मीशा शाहिदच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी उपस्थित होती म्हणून चित्रपटाच्या टीमने त्याला  टाळया वाजवून कौतुकाने पाठिंबा दिला. 

                                           

Web Title: Shaheed Misha's company on 'Padmavati' set?