शाहरूख खान पुन्हा बनणार ‘होस्ट’!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:23 IST2018-08-16T20:23:16+5:302018-08-16T20:23:38+5:30
शाहरूख खान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. एक गाजलेला टीव्ही शो होस्ट करताना तो दिसणार आहे. या शोचे नाव आहे, टेड टॉक्स.

शाहरूख खान पुन्हा बनणार ‘होस्ट’!!
शाहरूख खान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. एक गाजलेला टीव्ही शो होस्ट करताना तो दिसणार आहे. या शोचे नाव आहे, टेड टॉक्स. होय, या शोचे दुसरे सीझन लवकरच येतेय आणि पहिल्या सीझनप्रमाणे दुसऱ्या सीझनमध्येही शाहरूखचं हा शो होस्ट करणार आहे.
यंदा डिसेंबरपर्यंत टेड टॉक्सचे दुसरे सीझन प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शोचे पहिले सीझनही गतवर्षी आॅगस्टमध्ये शूट झाले होते आणि डिसेंबरमध्ये आॅन-एअर झाले होते. खरे तर टेड टॉक्सचे पहिले सीझन अपेक्षेनुरूप टीआरपी मिळवू शकले नव्हते. कारण या शोची आयडिया खूपच युनिक होती. याचवर्षी एप्रिलमध्ये टेडने या शोचे तीन सीझन येणार, असे जाहिर केले होते. तूर्तास दुस-या सीझनची तयारी सुरू झाली आहे. पहिल्या सीझनचे सात एपिसोड होते. दुस-या सीझनमध्ये ८ ते १० एपिसोड असतील, अशी शक्यता आहे. पहिल्या सीझनमध्ये करण जोहर, एकता कपूर, जावेद अख्तर असे सेलिब्रिटी शोमध्ये सामील झाले होते. आता दुस-या शोमध्ये कोण सामील होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
शाहरूख खान त्याचा आगामी चित्रपट ‘झिरो’त एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे. शाहरूखसारखा उंचपुरा अभिनेता बुटक्या व्यक्तिची भूमिका कशी साकारू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे. पण याचे उत्तर द्यायचे झाल्यास केवळ एकच आहे. ते म्हणजे, स्पेशल इफेक्ट्स. होय, या चित्रपटातील शाहरूखची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्यासाठी अतिशय अॅडव्हान्स व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर केला गेला आणि हे बनवायला दोन वर्षे खर्ची घालावी लागलीत.