लॉकडाऊनमध्ये शाहरूखने केली कामाला सुरूवात, घरातूनच करतोय शूटिंग, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 11:35 IST2020-06-27T11:33:51+5:302020-06-27T11:35:42+5:30

व्हिडिओमध्ये हे पाहायला मिळू शकते की शाहरुख खान आपल्या बंगल्याच्या 'मन्नत'च्या बाल्कनीमध्ये उभा आहे आणि काहीतरी शूट करत आहे. व्हिडिओमध्ये कॅमेरा आणि लाईटसही स्पष्टपणे दिसत आहेत.

Shah Rukh Khan starts work in lockdown, shooting from home, video goes viral | लॉकडाऊनमध्ये शाहरूखने केली कामाला सुरूवात, घरातूनच करतोय शूटिंग, व्हिडीओ व्हायरल

लॉकडाऊनमध्ये शाहरूखने केली कामाला सुरूवात, घरातूनच करतोय शूटिंग, व्हिडीओ व्हायरल

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात सा-यांना धडकी भरवली आहे. या कठीण काळात बहुतेक लोक घरातच बसून काम करत आहेत. कोरोनाव्हायरसचा मनोरंजन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. बॉलिवूडमधील अनेक सिनेमांचे शूटिंग पूर्णपणे थांबले आहे, त्यामुळे चित्रपटसृष्टीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. अशात बॉलिवूडचा किंग शाहरुख खान या कठीण काळात आपल्या घरातून काम करत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये किंग खान आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये शूटिंग करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये हे पाहायला मिळू शकते की शाहरुख खान आपल्या बंगल्याच्या 'मन्नत'च्या बाल्कनीमध्ये उभा आहे आणि काहीतरी शूट करत आहे. व्हिडिओमध्ये कॅमेरा आणि लाईटसही स्पष्टपणे दिसत आहेत. या अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांच्या कमेंटस सोशल मीडियावर उमटू लागल्या. शाहरुख खानच्या या व्हिडिओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. लॉकडाऊनंतर शाहरूनख चाहत्यांना खास सरप्राईज देणार असेच दिसतंय.


अभिनेता शाहरुख खान अखेर 'झिरो' सिनेमात दिसला होता. या सिनेमात तो कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मासोबत काम करताना दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही, त्यानंतर शाहरुख कोणत्याच नवीन सिनेमात झळकला नाही. पण, आता हा व्हिडिओ पाहून काही तरी एक्सायटींग असणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Shah Rukh Khan starts work in lockdown, shooting from home, video goes viral