NCB च्या क्लीनचीटनंतर आर्यन खानने केली पुन्हा पार्टी; ड्रिंक करतानाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 14:51 IST2022-07-19T14:50:34+5:302022-07-19T14:51:09+5:30
Aryan khan: सध्या सोशल मीडियावर आर्यनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

NCB च्या क्लीनचीटनंतर आर्यन खानने केली पुन्हा पार्टी; ड्रिंक करतानाचा व्हिडीओ व्हायरल
ड्रग्स पार्टी केल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा (shah rukh khan) लेक आर्यन खान (aryan khan) चांगलाच चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी एका क्रुझवर ड्राग्स पार्टी करताना एनसीबीने (NCB) आर्यनला रंगेहात पकडलं होतं. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. सध्या आर्यनला या प्रकरणी सध्या आर्यनला दिलासा मिळाला असला तरीदेखील तो पुन्हा एका पार्टीमध्ये ड्रिंक घेताना स्पॉट झाला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अलिकडेच एनसीबीने आर्यन खानला क्लीनचीट दिली. २७ मेला एनसीबीने १४ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यातून आर्यनचे नाव वगळण्यात आलं. मात्र, क्लीनचीट मिळताच आर्यन पुन्हा एकदा पार्टी करताना दिसून आला. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. इतकंच नाही तर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोलही केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर आर्यनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आर्यन एका क्लबमध्ये असून ड्रिंक घेताना दिसत आहे.
दरम्यान, पार्टीत सहभागी झालेल्या आर्यनने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. तसंच त्याने मास्कही घातला होता. मात्र, ड्रिंक घेताना त्याने चेहऱ्यावरील मास्क खालती केला आणि त्याचा फोटो सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी ( १८ जुलै) आर्यनने ही पार्टी केली आहे. या पार्टीमध्ये त्याच्यासोबत काही मित्र असल्याचंही पाहायला मिळत आहे. मात्र, हा व्हिडीओ जुना आहे की लेटेस्ट आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.