Aryan Khan Post: आर्यन खानची मोठी घोषणा...! शाहरूख-गौरीचा आनंद गगनात मावेना...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 10:29 AM2022-12-07T10:29:49+5:302022-12-07T10:30:12+5:30

Shah Rukh Khan son Aryan Khan Post: आर्यनला मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. पण आर्यनला ‘हिरो’ होण्यात नाही तर ‘पडद्यामागचा हिरो’ होण्यात इंटरेस्ट आहे आणि आता प्रतीक्षा संपलीये.

shah rukh khan son aryan khan announces his debut in bollywood first script | Aryan Khan Post: आर्यन खानची मोठी घोषणा...! शाहरूख-गौरीचा आनंद गगनात मावेना...!!

Aryan Khan Post: आर्यन खानची मोठी घोषणा...! शाहरूख-गौरीचा आनंद गगनात मावेना...!!

googlenewsNext

Shah Rukh Khan son Aryan Khan Post:  बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan ) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan ) चित्रपटांपासून दूर असूनही सतत चर्चेत असतो. आर्यनला मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. पण आर्यनला ‘हिरो’ होण्यात नाही तर ‘पडद्यामागचा हिरो’ होण्यात इंटरेस्ट आहे आणि आता प्रतीक्षा संपलीये. होय, आर्यन खानचं फिल्मी करिअर लवकरच सुरू होतंय. खुद्द आर्यनने सोशल मीडियावर याबद्दलची घोषणा केली आहे.

आर्यनने  त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत, आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आर्यनने त्याच्या इंस्टा वर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये एका चित्रपटाची स्क्रिप्ट दिसत आहे आणि त्या स्क्रिप्टवर आर्यनचं नाव लिहिलेलं आहेत.  सोबतच ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’चं नावही आहे.

‘लेखनाचं पूर्ण झालं आहे..आता शूटिंगसाठी प्रतीक्षा करू शकत नाही...,’असं हा फोटो शेअर करत आर्यनने लिहिलं आहे. याचा अर्थ एकच, आर्यनने चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. स्क्रिप्ट तयार आहे आणि शाहरूखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली हा सिनेमा तयार होणार आहे. आर्यन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार, असं मानलं जात आहे.
आर्यन एका सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत होता. फायनली ते काम पूर्ण झालं आहे. आता आर्यनला ‘अ‍ॅक्शन’ म्हणण्याची संधी मिळणार आहे. तो अनेक वर्षांपासून केवळ याच एका क्षणाची प्रतीक्षा करत होता. चर्चा खरी मानाल तर  आर्यन खान नेटफ्लिक्सच्या आगामी वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. पुढच्या वर्षात ही वेब-सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. 

शाहरूख व गौरीचा आनंद गगनात मावेना...
आपला मुलगा करिअर सुरू करतोय म्हटल्यावर कोणत्या आईबाबाला आनंद होणार नाही. शाहरूख खान व गौरी खान हे दोघंही याला अपवाद नाही. आर्यनने आपल्या प्रोजेक्टची घोषणा करताच शाहरूख व गौरीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

वाह..विचार केलास..विश्वास ठेवला आणि आता अखेर स्वप्न पूर्ण होत आहे. पहिला प्रोजेक्ट नेहमीच खास असतो. तुला पहिल्या सिनेमासाठी खूप शुभेच्छा..., अशी कमेंट शाहरूखने लेकाच्या पोस्टवर केली आहे. आई गौरी खान हिनेही आर्यनच्या पोस्टवर कमेंट केली आहे. आता सिनेमाची प्रतीक्षा..., असं तिने लिहिलं आहे.  

Web Title: shah rukh khan son aryan khan announces his debut in bollywood first script

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.