कन्फर्म! आर. माधवन दिग्दर्शनात करणार डेब्यू, लाजवाब भूमिकेत दिसणार शाहरूख खान...

By अमित इंगोले | Updated: October 31, 2020 12:38 IST2020-10-30T14:00:53+5:302020-10-31T12:38:28+5:30

स्पॉटबॉयला दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूख खानचा पुढील सिनेमा अंतराळ वैज्ञानिक नांबी नारायणन यांचा बायोपिक आहे. याच सिनेमात शाहरूख खान पत्रकाराच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

Shah Rukh Khan to play a television journalist in R Madhavan directorial debut Rocketry | कन्फर्म! आर. माधवन दिग्दर्शनात करणार डेब्यू, लाजवाब भूमिकेत दिसणार शाहरूख खान...

कन्फर्म! आर. माधवन दिग्दर्शनात करणार डेब्यू, लाजवाब भूमिकेत दिसणार शाहरूख खान...

बॉलिवूड किंग शाहरूख खानचे गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत. अशात त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरूख खान त्याच्या आगामी सिनेमात पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. तर या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन दुसरं तिसरं कुणी नाही तर बॉलिवूडचा शानदार अभिनेता आर. माधवन करणार आहे. त्यामुळे आता या सिनेमाची उत्सुकता दोघांच्याही फॅन्सना लागली आहे. 

स्पॉटबॉयला दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूख खानचा पुढील सिनेमा अंतराळ वैज्ञानिक नांबी नारायणन यांचा बायोपिक आहे. याच सिनेमात शाहरूख खान पत्रकाराच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Rocketry असं या सिनेमाचंं टायटल असल्याचं समजलं.

असेही सांगितले जात आहे की, या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता आर.माधवन दिग्दर्शनाच्या दुनियेत पहिलं पाऊल ठेवत आहे. शाहरूख खानचा शेवटचा सिनेमा २०१८ मध्ये रिलीज झाला होता. तो आनंद एल रॉयच्या झिरो सिनेमात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफसोबत दिसला होता. 

तसेच शाहरूख खान सध्या त्याच्या वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. पण शाहरूखने त्याच्या आगामी सिनेमाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. पण असे सांगितले जात आहे की, तो त्याच्या आगामी सिनेमात याच वाढलेल्या केसांसोबत दिसणार आहे.

दरम्यान, अशीही चर्चा आहे की, तब्बल दोन वर्षानंतर आता शाहरूख कमबॅक करतो आहे. त्याने एक नाही 2 नाही तब्बल तीन चित्रपट साईन केले आहेत. शाहरुख खान लवकरच 'पठाण' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यानंतर तो राजकुमार हिरानी आणि एका दाक्षिणात्य फिल्ममेकरच्या चित्रपटातही काम करणार आहे. एकीकडे शाहरूखच्या पठाण चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असताना अशी माहिती मिळते आहे की शाहरुख खान पहिल्यांदाच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील दिग्दर्शक एटली यांच्यासोबत काम करणार आहे. 

या सिनेमामध्ये शाहरुखचा डबल रोल असेल. या आधी त्याने ड्युप्लीकेट आणि डॉन या सिनेमांमध्ये डबल रोल साकारला होता. त्यानंतर आता तिसऱ्यांदा शाहरूख डबल रोल करणार आहे. यामध्ये शाहरुख मुलगा आणि वडीलांची भूमिका साकारणार आहे. 2 पिढ्यांमधील अंतर हा विषय या सिनेमामध्ये हाताळला जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात शाहरुख एका सीनिअर रॉ एजंटच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या फिल्ममध्ये मेकअपवर बराच भर देण्यात आला आहे. शाहरुखच्या लूकवर या सिनेमात खूप मेहनत घेण्यात येत आहे. 
 

Web Title: Shah Rukh Khan to play a television journalist in R Madhavan directorial debut Rocketry