शाहरुखनेच का केलं होतं फराह खानचं कन्यादान? इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:38 IST2025-11-10T15:38:30+5:302025-11-10T15:38:54+5:30
शाहरुख केवळ फराहचा जवळचा मित्रच नाही, तर त्यानं तिचं कन्यादानही केलं होतं.

शाहरुखनेच का केलं होतं फराह खानचं कन्यादान? इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं कारण!
बॉलिवूडमध्येशाहरुख खान आणि फराह खान यांची मैत्री ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. दोघांनी मिळून अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यामध्ये 'मैं हूँ ना', 'ओम शांती ओम', 'हॅपी न्यू इयर' यांचा समावेश आहे. शिवाय, शाहरुखच्या अनेक चित्रपटासाठी फराह खानने कोरिओग्राफर म्हणून काम केलंय. फराह आणि शाहरुखचं नातं फक्त चित्रपटांपुरतं मर्यादित नाही, ते एकमेकांना कुटुंबीयांप्रमाणे जपतात. पण, फार कमी लोकांना माहिती आहे की शाहरुख केवळ फराहचा जवळचा मित्रच नाही, तर त्यानं तिच्या लग्नात कन्यादानही केलं होतं.
शाहरुखने फराह खानचे कन्यादान केल्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Missmalini नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये फराह खान व तिचा नवरा शिरीश कुंदर पारंपरिक पेहरावात पाहायला मिळत आहेत. तर त्यांच्याबरोबर तिथे शाहरुख खान व गौरी खानही उपस्थित असल्याचं दिसतं. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये शाहरुख खान स्वतः फराह खानचं कन्यादान करताना दिसतोय. या व्हिडीओवर फराहने स्वत: "तुम्हाला हे कुठे सापडलं" अशी कमेंटही केली आहे.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी फराह आणि शाहरुख यांच्यातील या नात्याचं कौतुक केलं, तर काहींनी व्हिडीओतील कन्यादानावर प्रश्न उपस्थित केले. एका नेटकऱ्याने कमेंट केली की, "हे कन्यादान नाहीये, फराहसोबत तिची आई आणि भाऊ होते". त्यावर फराहने थेट उत्तर देत स्पष्ट केलं, "मंगलुरूमध्ये फक्त विवाहित जोडपंच कन्यादान करू शकतात, त्यामुळे निरर्थक बोलण्यापूर्वी विचार करा". फराह खान आणि शिरीष कुंदर यांनी २००४ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. या जोडप्याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. शिरिष आणि तिच्या वयामध्ये साधारण ८ वर्षाचं अंतर होतं.
तीन दशकांहून अधिक काळची मैत्री
१९९४ मध्ये कुंदन शाह यांच्या 'कभी हा कभी ना' या चित्रपटात एकत्र काम करण्यापासून शाहरुख खान आणि फराह खान यांच्या मैत्रीची सुरुवात झाली होती. या दोघांमधली मैत्री, परस्पर आदर आणि एकमेकांविषयी असलेली जिव्हाळ्याची भावना वर्षानुवर्षे अधिक घट्ट झाली आहे. विशेष म्हणजे जेव्हा वयाच्या ४० व्या वर्षी आयव्हीएफद्वारे फराहला गर्भधारणा झाली होती, तेव्हा तिनं तिच्या आईनंतर शाहरुखला ही आनंदाची बातमी दिली होती. या जोडीचं नातं आजही तितकंच अतूट आणि खास आहे.