प्लीज, मला साईन कर...! शाहरूख खानवर आली आलियाकडे काम मागण्याची वेळ, वाचा तिचा रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 14:46 IST2021-07-04T14:40:52+5:302021-07-04T14:46:18+5:30

अभिनेत्री आलिया एक उत्तम अभिनेत्री आहे हे आपण सर्वचजण जाणतो. मात्र आत्ता आलिया अभिनेत्रीसोबतचं निर्मातीसुद्धा बनली आहे.

Shah Rukh Khan needs to work in an Alia Bhatt manufacturing, guarantees 'I'll are available in time for the shoot | प्लीज, मला साईन कर...! शाहरूख खानवर आली आलियाकडे काम मागण्याची वेळ, वाचा तिचा रिप्लाय

प्लीज, मला साईन कर...! शाहरूख खानवर आली आलियाकडे काम मागण्याची वेळ, वाचा तिचा रिप्लाय

ठळक मुद्देआलियाच्या या आगामी सिनेमाबद्दल सांगायचे तर ‘डार्लिंग्स’ या चित्रपटात आलिया स्वत: अभिनय करताना दिसणार आहे.

आलिया भट (Alia Bhatt )आता केवळ अभिनेत्री राहिलेली नाही. तर निर्माती बनली आहे. होय, आता निर्माता म्हटलं की, त्याच्याकडे कामाची मागणी होणारच. आलिया निर्माती बनताच तिच्याकडेही कामाची मागणी होतेय आणि काम मागणारा दुसरा कोणी नाही तर बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान (ShahRukh Khan)आहे. होय, मला तुझ्या नवीन प्रोजेक्टसाठी साईन कर, अशा शब्दांत त्याने थेट आलियाकडे काम मागितले आहे.
 अलीकडे आलियाने तिच्या ‘डार्लिंग्स’ या सिनेमाच्या सेटवरचा फोटो शेअर केला होता. यात ती सिनेमाची स्क्रिप्ट वाचत असलेली दिसली होती. निर्माती म्हणून आलियाचा हा पहिला सिनेमा आहे. आलियाचा हाच फोटो  रिट्वीट करत शाहरूखने तिच्याकडे काम मागितले आहे.

‘या चित्रपटाच्या निर्मितीनंतर कृपया मला तुझ्या नवीन प्रोजेक्टसाठी साइन कर.मी वचन देतो की, मी शूटींगसाठी अगदी वेळेत येईल आणि मन लावून काम करेल,’ अशा आशायचे ट्वीट शाहरुखने केले आहे.

आपल्या या ट्वीटवर आलिया काय उत्तर देईल, याची प्रतीक्षा शाहरूखला होतीच. त्यानुसार आलियानेही उत्तर दिलेय. ‘हाहाहाहा... मी याहून जास्त काही मागू शकत नाही... तुझी व माझी डील पक्की. मी तुला साईन केले, समज. माझी सगळ्यात आवडती व्यक्ती....,’असा रिप्लाय तिने केला. 
आलियाच्या या आगामी सिनेमाबद्दल सांगायचे तर ‘डार्लिंग्स’ या चित्रपटात आलिया स्वत: अभिनय करताना दिसणार आहे. तिच्यासोबत विजय वर्मा, रोशन मैथ्यू आणि शेफाली शाह  यांच्या मुख्य भूमिका आहेत. आई आणि मुलीच्या कथेवर आधारित या चित्रपटात मुंबईच्या पुराणमतवादी मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी दाखवण्यात येणार आहे.

Web Title: Shah Rukh Khan needs to work in an Alia Bhatt manufacturing, guarantees 'I'll are available in time for the shoot