लग्नानंतर शाहरुख खान चक्क गौरीशी बोलला होता खोटा, त्यानेच सांगितली होती ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 11:00 IST2020-04-28T10:57:00+5:302020-04-28T11:00:02+5:30

शाहरुखने हा किस्सा नुकताच एका पुरस्कार सोहळ्यात सांगितला.

Shah Rukh Khan on his honeymoon: Main Gauri ko Paris bolke Darjeeling le gaya PSC | लग्नानंतर शाहरुख खान चक्क गौरीशी बोलला होता खोटा, त्यानेच सांगितली होती ही गोष्ट

लग्नानंतर शाहरुख खान चक्क गौरीशी बोलला होता खोटा, त्यानेच सांगितली होती ही गोष्ट

ठळक मुद्देशाहरुखने सांगितले होते की, मी गौरीला वचन दिले होते की, आपण हनिमूनला पॅरिसला जाऊ या... पण त्यावेळी माझ्याकडे पॅरिसला जाण्याइतके पैसे नव्हते. आपण पॅरिसला जातोय असे सांगून मी गौरीला चक्क दार्जिलिंगला घेऊन गेलो होतो.

शाहरुख खान आणि गौरी खानची जोडी बॉलिवूडमधील सगळ्यात क्यूट जोडींपैकी एक मानली जाते. त्यांच्या लग्नाला इतकी वर्षं झाली असली तरी त्यांच्यातील केमिस्ट्री आजही टिकून आहे. त्यांना तीन मुलं असून शाहरुखच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शाहरुख नेहमीच मुलांसोबतचे फोटो पोस्ट करत असतो. त्यांनी 25 ऑक्टोबर 1991 मध्ये अतिशय कमी लोकांच्या उपस्थित लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला सुरुवातीला गौरीच्या घरातून विरोध होता. पण कालांतराने हा विरोध मावळला.

शाहरुख खान आणि गौरी खान यांची प्रेमकथा ही एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे. त्या दोघांची भेट झाली होती, त्यावेळी शाहरुख केवळ १८ वर्षांचा होता. ते दोघे एका पार्टीत भेटले आणि तिथून त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली. गौरी ही प्रचंड श्रीमंत कुटुंबातील होती तर शाहरुख त्यावेळी बॉलिवूडमध्ये सेटल होण्यासाठी स्ट्रगल करत होता. शाहरुख लग्नानंतर गौरीसोबत एकदा खोटं बोलला होता. शाहरुख तिच्यासोबत काय खोटं बोलला होता हे वाचून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल...

शाहरुख गौरीशी काय खोटं बोलला होता हे त्यानेच २०१९ मधील एका पुरस्कार सोहळ्यात सांगितले होते. हा शाहरुख आणि गौरीच्या हनिमूनचा एक भन्नाट किस्सा आहे. या पुरस्कार सोहळ्यात विकी कौशलने शाहरुखला त्यांच्या हनिमूनचा एक फोटो दाखवला होता. त्यावर शाहरुखने सांगितले होते की, मी गौरीला वचन दिले होते की, आपण हनिमूनला पॅरिसला जाऊ या... पण त्यावेळी माझ्याकडे पॅरिसला जाण्याइतके पैसे नव्हते. मी खूपच गरीब होतो. माझ्या राजू बन गया जंटलमन या चित्रपटाचे त्यावेळी दार्जिलिंगला चित्रीकरण सुरू होते. त्यामुळे मी विचार केला की, मी याच गोष्टीचा फायदा घेत गौरीला दार्जिलिंगला तरी घेऊन जाईन... आपण पॅरिसला जातोय असे सांगून मी गौरीला चक्क दार्जिलिंगला घेऊन गेलो होतो. 

Web Title: Shah Rukh Khan on his honeymoon: Main Gauri ko Paris bolke Darjeeling le gaya PSC