Suhana Khan On Pathaan: 'पठाण'चं यश पाहून भावूक झाली शाहरुख खानची लाडकी लेक, वडिलांसाठी लिहिली खास पोस्ट..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 05:04 PM2023-01-27T17:04:51+5:302023-01-27T17:13:18+5:30

बाप आणि लेकीचं नातं वेगळंच असतं. आपल्या वडिलांच्या चित्रपटाला मिळालेले जबरदस्त यश पाहून सुहाना खानही भावूक झालीय.

shah rukh khan daughter Suhana khan got emotional after looking at the worldwide response to her father pathaan | Suhana Khan On Pathaan: 'पठाण'चं यश पाहून भावूक झाली शाहरुख खानची लाडकी लेक, वडिलांसाठी लिहिली खास पोस्ट..

Suhana Khan On Pathaan: 'पठाण'चं यश पाहून भावूक झाली शाहरुख खानची लाडकी लेक, वडिलांसाठी लिहिली खास पोस्ट..

googlenewsNext

 शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने 'KGF-2'सह अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड तोडला आहेत. पहिल्या दिवशी सूमारे 57 कोटींची कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत कमालीची वाढ झाली. 'पठाण'ने दुसऱ्या दिवशी(दि. 26) तब्बल 70 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या जबरदस्त कमाईने व्यापार विश्लेषकांही चकीत केले आहे. किंग खानच्या चित्रपटाने दोन दिवसांत 127 कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे. दरम्यान, शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खानने पठाण चित्रपटाच्या यशाबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

सुहाना खानने इन्स्टा स्टोरीवर पूजा ददलानीची इन्स्टाग्राम पोस्ट पुन्हा शेअर केली आहे, ज्यामध्ये 'पठाण'च्या कलेक्शनची माहिती आहे. चित्रपटाच्या पोस्टरसोबत लिहिले आहे, 'हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मोठी ओपनिंग. पहिल्या दिवशी पठाण चित्रपटाचे वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन 106 कोटी रुपये. ही पोस्ट शेअर करत सुहानाने कॅप्शनमध्ये अश्रूवाला इमोजी शेअर केला आहे. तिच्या या इन्स्टा पोस्टवरुन लक्षात येतंय की वडील शाहरुख खानच्या चित्रपटाला मिळालं यश पाहून सुहाना भावूक झाली आहे. 

सर्वत्र फक्त 'पठाण'चा डंका
पहिल्या दिवशी भारतात 57 कोटींची बंपर ओपनिंग केल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही पठाणचा डंका वाजला. पठाणला प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा चांगलाच फायदा झाला. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते पठाणच्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) 70 कोटींचा गल्ला जमवला आहे. पठाणच्या कमाईचा आकडा दोन दिवसांत 127 कोटींवर गेला आहे. दुसऱ्या दिवसाच्या कमाईत पठाणने KGF 2 वर मात केली आहे. KGF 2 च्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या दिवशी 47 कोटींची कमाई केली होती.

पठाणने अनेक विक्रम मोडीत काढले
पठाण दुसऱ्या दिवशी 60-65 कोटींपर्यंत मजल मारेल, असा अनेक विश्लेषकांनी अंदाज वर्तवला होता. पण या सगळ्या अपेक्षांच्या पुढे जाऊन पठाणने जबरदस्त कमाई केली. पठाणचा डंका देश-विदेशात वाजत आहे. विशेष म्हणजे, पठाणने अवघ्या दोन दिवसांतच जगभरातील बॉक्स ऑफिसवर 235 कोटींची कमाई केल्याचेही रमेश बाला यांनी ट्विटरवरुन सांगितले.

बॉक्स ऑफिस मालामाल
शाहरुख खान पठाणसोबत तब्बल 4 वर्षांनी रुपेरी पडद्यावर परतला आहे. ग्लॅमर, अॅक्शन, थ्रिल, सस्पेन्स... हे सर्व पठाणमध्ये आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांचा याला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. एकंदरीतच पठाणने शाहरुखला पुन्हा एकदा बॉलिवूडचा 'किंग' बनवले हे. 
 

Web Title: shah rukh khan daughter Suhana khan got emotional after looking at the worldwide response to her father pathaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.