ओटीटीवर कधी-कुठे प्रदर्शित होणार शाहरुख, आर्यन अन् अबरामचा 'मुफासा द लायन किंग' सिनेमा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 13:10 IST2024-12-22T13:08:27+5:302024-12-22T13:10:47+5:30
हा सिनेमा ओटीटीवर कधी येणार या प्रतीक्षेत चाहते आहेत.

ओटीटीवर कधी-कुठे प्रदर्शित होणार शाहरुख, आर्यन अन् अबरामचा 'मुफासा द लायन किंग' सिनेमा?
Mufasa The Lion King: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख, आर्यन खान आणि अबराम खान यांचा आवाज असलेला 'मुफासा द लायन किंग' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला लोकांची चांगली पसंती मिळत आहे. हा सिनेमा ओटीटीवर कधी येणार या प्रतीक्षेत चाहते आहेत. चला तर जाणून घेऊया...
'मुफासा द लायन किंग' हा थिएटरमध्ये 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटासाठीची उत्सुकता ही फक्त मुलं नाही तर त्यासोबत मोठ्यांना देखील होती. रिपोर्टनुसार हा सिनेमा नेटफ्लिक्स किंवा Amazon Prime Video वर स्ट्रीम होण्याची शक्यता कमी आहे. कारण हा चित्रपट डिस्ने निर्मित आहे. यावरून हे अगदी स्पष्ट आहे की 'मुफासा: द लायन किंग' डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होईल. साधारण सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यांनी ओटीटीवर येतो.
शाहरुखने मुफासा या मुख्य भूमिकेचं हिंदीत डबिंग केलं आहे. तर आर्यनने मुफासाचा मुलगा सिंबा आणि अबरामने तरुण मुफासाचं रेकॉर्डिंग केलं आहे. या सिनेमासाठी शाहरुख आणि त्याच्या लेकांबरोबरच श्रेयस तळपदे, मकरंद देशपांडे, संजय मिश्रा, मियांग चांग या कलाकारांनीही आवाज दिले आहेत. तर तेलुगु भाषेतील डबिंगसाठी सुपरस्टार महेश बाबूने या चित्रपटाला आवाज दिला आहे.
अॅनिमेशन चित्रपट 'द लायन किंग' हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यानंतर 2019 मध्ये या चित्रपटाचा रीमेक बनवण्यात आला. आता तब्बल 5 वर्षांनंतर त्याचा प्रीक्वल आला आहे.