Dilwale Dulhania Le Jayenge Box Office Collection: 27 वर्षानंतरही ‘DDLJ’ची जादू कायम, चित्रपटाने केली इतकी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 04:59 PM2022-11-04T16:59:01+5:302022-11-04T16:59:34+5:30

Dilwale Dulhania Le Jayenge Box Office Collection : गेल्या 2 नोव्हेंबरला शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ हा सिनेमा काही निवडक शहरामध्ये पुन्हा एकदा रिलीज झाला आणि 27 वर्षानंतर आजही या चित्रपटाची जादू  कायम आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

Shah Rukh Khan and Kajol film Dilwale Dulhania Le Jayenge Box Office Collection | Dilwale Dulhania Le Jayenge Box Office Collection: 27 वर्षानंतरही ‘DDLJ’ची जादू कायम, चित्रपटाने केली इतकी कमाई

Dilwale Dulhania Le Jayenge Box Office Collection: 27 वर्षानंतरही ‘DDLJ’ची जादू कायम, चित्रपटाने केली इतकी कमाई

googlenewsNext

 Dilwale Dulhania Le Jayenge Box Office Collection : 1995 मध्ये रिलीज झालेल्या एका चित्रपटानं प्रेक्षकांवर अक्षरश: जादू केली होती आणि आज 27 वर्षानंतरही ही जादू कायम आहे. आम्ही बोलतोय ते शाहरूख खान  (Shah Rukh Khan) व काजोलच्या  (Kajol)  ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’  (Dilwale Dulhania Le Jayenge) या सुपरडुपर हिट रोमॅन्टिक चित्रपटाबद्दल.  गेल्या 2 नोव्हेंबरला शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ हा सिनेमा काही निवडक शहरामध्ये पुन्हा एकदा रिलीज झाला आणि 27 वर्षानंतर आजही या चित्रपटाची जादू  कायम आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली.

शाहरूखच्या वाढदिवशी काही चित्रपटगृहांत ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ रिलीज झाला. काही निवडक पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसमध्येही या चित्रपटाचं स्क्रिनिंग केलं गेलं. 27 वर्षानंतरही या चित्रपटाला अद्भूत प्रतिसाद मिळाला आणि या सिनेमाने तब्बल 25 लाखांची कमाई केली. अनेक ठिकाणी अगदी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले. हा सिनेमा गुरुवारपर्यंत थिएटरमध्ये असेल.

शाहरूखच्या वाढदिवशी त्याचा आगामी सिनेमा ‘पठान’चा टीझर रिलीज करण्यात आला. हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला रिलीज होतोय. सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात शाहरूखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम लीड रोलमध्ये आहेत.  त्यानंतर त्याचा ‘जवान’ हा अ‍ॅक्शन सिनेमा रिलीज होणार आहे. राजकुमार हिरानी यांच्या बहुप्रतीक्षित ‘डंकी’ या सिनेमाही शाहरूख झळकणार आहे. 2018 मध्ये ‘झिरो’ फ्लॉप झाल्यानंतर शाहरुख सिनेमात दिसलाच नाही. त्यामुळे आता त्याच्या आगामी सिनेमांकडून निर्मात्यांनाही मोठी अपेक्षा आहे. निर्मात्यांचे शाहरुखवर जवळपास 500 कोटी रुपये लागलेले आहेत.  

Web Title: Shah Rukh Khan and Kajol film Dilwale Dulhania Le Jayenge Box Office Collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.