#EidMubarak: शाहरूख खान व चिमुकल्या अबरामने अशा दिल्या ईदच्या शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 18:50 IST2018-08-22T18:49:09+5:302018-08-22T18:50:08+5:30
शाहरूख बाल्कनीत येतो आणि ‘मन्नत’ बाहेर उभ्या असलेल्या शेकडो चाहत्यांना हात हलवून अभिवादन करत ईदच्या शुभेच्छा देतो. आजही हेच चित्र दिसले

#EidMubarak: शाहरूख खान व चिमुकल्या अबरामने अशा दिल्या ईदच्या शुभेच्छा!
आज बकरी दिन आणि ईदच्या दिवशी ‘मन्नत’च्या बाल्कनीत किंगखान शाहरूख खान नाही, असे अपवादानेचं घडते. शाहरूख बाल्कनीत येतो आणि ‘मन्नत’ बाहेर उभ्या असलेल्या शेकडो चाहत्यांना हात हलवून अभिवादन करत ईदच्या शुभेच्छा देतो. आजही हेच चित्र दिसले. पांढरा शर्ट आणि निळी जीन्स घातलेला ५२ वर्षांचा शाहरूख ‘मन्नत’च्या बाल्कनीत आला आणि त्याने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्यासोबत चिमुकला अबरामही दिसला. यावेळी चाहत्यांचा उत्साह बघण्यासारखा होता. चाहत्यांचा हा उत्साह तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओत बघू शकता.
Shah Rukh Khan outside Mannat today to wish FANs #EidMubarak ❤️ pic.twitter.com/UrUvlx5PQ5
— SRK Universe (@SRKUniverse) August 22, 2018
शाहरूख दरवर्षी ईदला आणि त्याच्या वाढदिवसाला ‘मन्नत’च्या बाल्कनीत येत, चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारतो. त्यांना शुभेच्छा देतो. या दिवशी ‘मन्नत’बाहेर सकाळपासून गर्दी जमते़ शेकडो चाहते शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या बंगल्याबाहेर गर्दी करतात.
लवकरचं शाहरूखचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.शाहरुख खान या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ प्रेक्षकांच्या आवडीची शृंखला आहे. या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत. शाहरूखची कंपनी रेड चिलीज् व्हीएफएक्सकडे हे काम आहे.शाहरूखच्या या चित्रपटासाठी विदेशातून एक्सपर्ट बोलवले गेलेत, असेही कळतेय. सलमान खानही शाहरुखच्या प्रेमापोटी या चित्रपटात कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे.