श्रद्धा कपूरने चाहत्यांना दिली वाढदिवसाची खास भेट! पाहा, ‘शेड्स आॅफ साहो - चॅप्टर 2’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 10:11 IST2019-03-03T10:10:57+5:302019-03-03T10:11:38+5:30

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आज तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करतेय. ‘साहो’च्या मेकर्सनी श्रद्धाच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट दिली आहे. होय, श्रद्धाच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधून ‘साहो’च्या मेकर्सनी ‘शेड्स ऑफ साहो - चॅप्टर 2’ हा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित केला आहे.

shades of saaho chapter 2 shraddha kapoor and prabhas starrer saahos new teaser is out | श्रद्धा कपूरने चाहत्यांना दिली वाढदिवसाची खास भेट! पाहा, ‘शेड्स आॅफ साहो - चॅप्टर 2’!!

श्रद्धा कपूरने चाहत्यांना दिली वाढदिवसाची खास भेट! पाहा, ‘शेड्स आॅफ साहो - चॅप्टर 2’!!

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आज तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करतेय. ‘साहो’च्या मेकर्सनी श्रद्धाच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट दिली आहे. होय, श्रद्धाच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधून ‘साहो’च्या मेकर्सनी ‘शेड्स ऑफ साहो - चॅप्टर 2’ हा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. या व्हिडीओत ‘साहो’च्या सगळ्या कलाकारांचा धमाकेदार अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळतोय. श्रद्धाची एन्ट्री तर पाहण्यासारखी आहे. हातात बंदूक घेतलेली श्रद्धा अतिशय कॉन्फिडन्ट दिसतेय. या चित्रपटात श्रद्धा व साऊथ सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत आहेत.

प्रभास आणि श्रद्धा दोघांचेही चाहते ‘साहो’कडे डोळे लावून बसले आहेत. ‘बाहुबली2’नंतर प्रभासचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळेही ‘साहो’बद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. ही उत्सुकता बघता, ‘साहो’च्या मेकर्सनी गत २२ आॅक्टोबरला प्रभासच्या वाढदिवशी ‘शेड्स ऑफ साहो’ व्हिडीओ रिलीज केला होता. त्याचवेळी ‘शेड्स ऑफ साहो’अशा सीरिजअंतर्गत असे आणखी व्हिडिओ रिलीज करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, आज श्रद्धाच्या वाढदिवसाला याचा सेकंड पार्ट प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘शेड्स ऑफ साहो हा प्रामुख्याने ‘साहो’चा मेकिंग व्हिडिओ आहे. ‘शेड्स ऑफ साहोचा पहिला व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक अक्षरश: क्रेजी झाले होते. ‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे़ तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title: shades of saaho chapter 2 shraddha kapoor and prabhas starrer saahos new teaser is out