On the Set : सलमान खान पोहोचला अजय देवगनच्या ‘बादशाहो’च्या सेटवर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 13:29 IST2017-01-28T07:59:51+5:302017-01-28T13:29:51+5:30

सलमान खान आणि अजय देवगन यांची मैत्री २० वर्ष जुनी.. त्यांनी त्यांचा बॉलिवूडमधील प्रवासही एकाचवेळी सुरू केला. ‘हम दिल ...

On the Set: Salman Khan finds Ajay Devgn's 'Badshaho' set on ...! | On the Set : सलमान खान पोहोचला अजय देवगनच्या ‘बादशाहो’च्या सेटवर...!

On the Set : सलमान खान पोहोचला अजय देवगनच्या ‘बादशाहो’च्या सेटवर...!

मान खान आणि अजय देवगन यांची मैत्री २० वर्ष जुनी.. त्यांनी त्यांचा बॉलिवूडमधील प्रवासही एकाचवेळी सुरू केला. ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘लंडन ड्रीम्स’ या चित्रपटांमध्ये त्यांची उत्कृष्ट बाँण्डिंग आपल्याला दिसून आली. २० वर्षांनंतर आजही त्यांची मैत्री घट्ट आहे. नुकताच सलमान खान जोधपूरमध्ये ‘काळवीट शिकार प्रकरण’ च्या सुनावणीसाठी गेला होता. सल्लूमियाँला जेव्हा कळालं की, अजय देवगन त्याचा आगामी चित्रपट ‘बादशाहो’ ची शूटींग जोधपूरमध्ये करतो आहे. तेव्हा त्याला अजयला भेटल्यावाचून राहवले नाही. त्याने थेट ‘बादशाहो’ चा सेट गाठला अन् अजय देवगनची भेट घेतली. दिग्दर्शक मिलन लुथरिया याने या दोघा मित्रांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘बादशाहो च्या सेटवर दोन सुल्तान ची भेट..’ असे या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे. 

                                   

ALSO READ : ​ अजय देवगणच्या आईची प्रकृती गंभीर; आयसीयूमध्ये भरती

मागील आठवड्यात अजय देवगनने चित्रपटाची शूटिंग थांबवली होती. त्याची आई वीणा देवगन यांना छातीमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचे निष्पन्न होताच शनिवारी हॉस्पिटलमध्ये तो त्यांना घेऊन गेला होता. त्यांची तब्येत सुधारल्यानंतरच अजयने त्याचे चित्रपटासाठीचे काम सुरू केले. ‘बादशाहो’ मध्ये इमरान हाश्मी, इशा गुप्ता, इलियाना डिक्रुझ आणि विद्युत जामवाल हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ऐश्वर्या रॉय बच्चन देखील या चित्रपटात असणार अशी चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र, नंतर याबाबतीत कुठलेही अपडेट्स मिळाले नाहीत. ‘शिवाय’ च्या जबरदस्त अपयशानंतर अजयला आता ‘बादशाहो’ कडून भरपूर अपेक्षा आहेत. १ सप्टेंबरला चित्रपट रिलीज होणार असून पुन्हा एकदा अजयला पडद्यावर पाहता येणार आहे. 

ALSO READ : ​​इम्रान हाश्मी का गातोय अजय देवगनचे गुणगाण?

Web Title: On the Set: Salman Khan finds Ajay Devgn's 'Badshaho' set on ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.