See Video : ‘भूमी’चे ट्रेलर रिलीज होताच सनी लिओनी बनली ‘खलनायक’; केला नागीण डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 22:02 IST2017-08-10T16:13:42+5:302017-08-10T22:02:07+5:30

बेबी डॉल सनी लिओनी मात्र वेगळ्याच मूडमध्ये बघावयास मिळत आहे. होय, सनीने सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ पोस्ट केला जे बघून संजूबाबाला नक्कीच त्याच्या ‘खलनायक’ची आठवण होईल.

See Video: Sunny Leone becomes 'villain' after 'Land' trailer release; Banana herpes dance! | See Video : ‘भूमी’चे ट्रेलर रिलीज होताच सनी लिओनी बनली ‘खलनायक’; केला नागीण डान्स!

See Video : ‘भूमी’चे ट्रेलर रिलीज होताच सनी लिओनी बनली ‘खलनायक’; केला नागीण डान्स!

िनेता संजय दत्त याच्या बहुप्रतिक्षित ‘भूमी’ या चित्रपटाचे ट्रेलर आज रिलीज करण्यात आले आहे. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर संजूबाबाच्या या अ‍ॅक्शन कम इमोशनल ड्रामा चित्रपटाने नेटिझन्सच्या हृदयाला स्पर्श केला. प्रत्येकालाच आता संजूबाबाच्या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. अशात आपली बेबी डॉल सनी लिओनी मात्र वेगळ्याच मूडमध्ये बघावयास मिळत आहे. होय, सनीने सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ पोस्ट केला जे बघून संजूबाबाला नक्कीच त्याच्या ‘खलनायक’ची आठवण होईल. 

सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सनी आणि तिची मैत्रीण संजूबाबाच्या ‘खलनायक हू मैं’ या चित्रपटावर थिरकताना दिसत आहे. या गाण्यात ती एवढी मग्न होऊन डान्स करीत आहे की, तिला कसलेच भान उरले नसल्याचे दिसत आहे. गाण्याच्या मध्यंतरात तर ती जमिनीवर झोपून नागीण डान्स करताना दिसत आहे. खरं तर सनीने हा व्हिडीओ म्हणजे संजूबाबाच्या ‘भूमी’ला शुभेच्छा देण्यासाठी शेअर केला आहे. परंतु तिचा अंदाज बघण्यासारखा असल्याने संजूबाबाला या शुभेच्छा नक्की आवडतील, यात शंका नाही. 
 

संजूबाबाच्या ‘भूमी’विषयी सांगायचे झाल्यास, ट्रेलर लॉन्चप्रसंगी तो खूपच भावुक झाल्याचे दिसून आले. संजूबाबा या चित्रपटात अशा वडिलांची भूमिका साकारत आहे, जो आपल्या मुलीच्या अबू्रसाठी संपूर्ण जगाशी लढा देण्याची मानसिकता ठेवतो. काही दिवसांपूर्वीच याच कथेच्या अनुषंंगाने रविना टंडन हिचा ‘मातृ’ आणि श्रीदेवीचा ‘मॉम’ हा चित्रपट आला होता. मात्र ‘भूमी’मध्ये वडिलांचा अ‍ॅँगल अतिशय वेगळ्या पद्धतीने दाखविण्यात आला आहे. हा चित्रपट रिवेंज ड्रामा आहे. ज्यामधून वडील आणि मुलीच्या नात्यावर प्रकाशझोत टाकला जातो. ५८ वर्षांच्या संजूबाबाला अ‍ॅक्शन आणि फाइट करताना बघणे खूपच मनोरंजक वाटते. 

या चित्रपटात सनी लिओनीचेही कनेक्शन आहे. होय, सनी ‘भूमी’मध्ये आयटम सॉँग करताना बघावयास मिळणार आहे. सनीचे हे आयटम सॉँग चित्रपटाच्या अखेरीस दाखविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सनीने टाइम्स आॅफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मी ओमंग कुमारच्या ‘भूमी’ या चित्रपटात एक डान्स नंबर करणार आहे. ज्याला गणेश आचार्य कोरिओग्राफ करणार आहे. हा एक पेपी ट्रॅक असेल जो यंगस्टर्सला भावेल. सनी अजय देवगणच्या ‘बादशाहो’मध्येही एक हॉट डान्स नंबर करताना दिसणार आहे. 

Web Title: See Video: Sunny Leone becomes 'villain' after 'Land' trailer release; Banana herpes dance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.