​पाहा : ‘हाफ गर्लफ्रेन्ड’मधील श्रद्धाचा स्पोर्टी लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 16:45 IST2016-06-19T11:15:05+5:302016-06-19T16:45:41+5:30

लेखक चेतन भगत याच्या नॉवेलवर आधारित ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ हा चित्रपट लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नवे स्टिल ...

See: Sporty look of faith in Half Girlfriends | ​पाहा : ‘हाफ गर्लफ्रेन्ड’मधील श्रद्धाचा स्पोर्टी लूक

​पाहा : ‘हाफ गर्लफ्रेन्ड’मधील श्रद्धाचा स्पोर्टी लूक

खक चेतन भगत याच्या नॉवेलवर आधारित ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ हा चित्रपट लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नवे स्टिल आज रविवारी आऊट झाले. यात अभिनेत्री श्रद्धा कपूर बास्केटबॉल जर्सीत दिसत आहे. या स्टिलमध्ये श्रद्धा पाठमोरी दिसतेय. तिचा चेहरा यात लपवण्यात आला आहे. रेड आणि डार्क ब्लू रंगाच्या स्लिव्हलेस जर्सीत पाठमोरी श्रद्धा चांगलीच हॉट दिसते. तिच्या एका हातात बास्केटबॉल दिसतोय आणि जर्सीवर सोमानी असे नाव लिहिलेले आहे. चित्रपटात श्रद्धा रिया सोमानी नामक मुलीची भूमिका साकारत आहे. बास्केटबॉल कोर्ट उभी असलेली रिया आणि तिच्या समोर प्रॅक्टिस करणारे खेळाडूही आहेत. विशेष म्हणजे या स्टिलमध्ये कॅमेराही दिसतोय. यावरून हा ‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या सेटवरील फोटो आहे, हे सांगायला नकोच.  ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ची शूटींग अगदी जोरात सुरु आहे, याचाच हा पुरावा म्हणायला हवा. होय ना??

Web Title: See: Sporty look of faith in Half Girlfriends