see pics : उदय चोप्रा बिनधास्त मग नर्गिस फखरीने का लपवला चेहरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 11:01 IST2017-04-30T07:19:34+5:302017-05-03T11:01:36+5:30

बॉयफ्रेन्ड उदय चोपडासोबत झालेले ब्रेकअप, त्याने लग्नास दिलेला नकार आणि नर्वस ब्रेकडाऊनमुळे नरगिस फखरी अचानक अमेरिकेला निघून गेल्याच्या बातम्यांची ...

see pics: Uday Chopra Bindhastha, then why is Nargis Fakhri hidden face? | see pics : उदय चोप्रा बिनधास्त मग नर्गिस फखरीने का लपवला चेहरा?

see pics : उदय चोप्रा बिनधास्त मग नर्गिस फखरीने का लपवला चेहरा?

यफ्रेन्ड उदय चोपडासोबत झालेले ब्रेकअप, त्याने लग्नास दिलेला नकार आणि नर्वस ब्रेकडाऊनमुळे नरगिस फखरी अचानक अमेरिकेला निघून गेल्याच्या बातम्यांची मध्यंतरी बरीच चर्चा झाली होती. अर्थात नर्गिसने  या बातम्या निव्वळ बकवास असल्याचे स्पष्ट केले होते. उदयने तर यावर एक आॅफिशिअल स्टेटमेंट जारी केले होते. नर्गिस व मी केवळ जवळचे मित्र आहोत. आम्हा दोघांच्या नात्याला मीडियाला रिलेशनशिपचे नाव देऊन मोकळा झालाय. पण यात काहीही सत्य नाही, असे त्याने म्हटले होते.  गतवर्षी म्हणजे २०१६ मध्ये या दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. यानंतर खुलासे-स्पष्टीकरण झालेत. पण या खुलाशानंतर उदय व नर्गिस कधीच एकत्र दिसले नाही. अर्थात आता तसे म्हणता येणार नाही. कारण,  सुमारे वर्षभरानंतर काल हे दोघे पहिल्यांदा एकत्र विमानतळावर दिसले.





यावेळी उदय ग्रे कलरचा स्वेटशर्ट आणि ब्ल्यू जीन्समध्ये दिसला. विमानतळावर फोटोग्राफर्सचे कॅमेरे उदयचे फोटो घेण्यासाठी सरसावले, तेव्हा उदयने अगदी हसून त्यांना प्रतिसाद दिला. पण नर्गिसचे म्हणाल तर, ती मीडियापासून चेहरा लपवताना दिसली. प्रिंटेट टी-शर्ट, ब्ल्यू जॉगर्स आणि जॅकेट अशा अवतारात नर्गिस विमानतळावर पोहोचली. पण पूर्णवेळ पिंक कलरच्या स्टोलने चेहरा लपवताना ती दिसली.





ALSO READ : नर्गिसची ही पोस्ट कुणासाठी??

आता नर्गिसच्या चेहरा लपवण्यामागचे कारण तर आम्हाला कळलेले नाही. कदाचित तिच्याबद्दल आणि उदयबद्दल लोकांनी लिहू नये, अशी नर्गिसची इच्छा असेल. पण चेहरा लपवून ही इच्छा कशी पूर्ण होणार? उलट उदय चोप्रा इतका बिनधास्त असताना नर्गिसने असा चेहरा लपवणे, याचीच मोठी हेडलाईन झाली. असो, काही तरी शिजले तर आपल्याला वास येईलच!

Web Title: see pics: Uday Chopra Bindhastha, then why is Nargis Fakhri hidden face?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.