See Pics : पुन्हा बॉयफ्रेन्डच्या हातात हात घालून दिसली सुश्मिता सेन, दिवाळी पार्टीत अशी घेतली एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 14:20 IST2018-11-06T14:19:04+5:302018-11-06T14:20:42+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये नव-नव्या जोडप्यांच्या प्रेमाची चर्चा आहे. अशीच एक जोडी म्हणजे सुश्मिता सेन व तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल. होय, सध्या सुश्मिता बिनधास्तपणे स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या या बॉयफ्रेन्डसोबत हातात हात घालून फिरतेय.

See Pics: sushmita sen again walks hand in hand with rumoured boyfriend rohman shawl | See Pics : पुन्हा बॉयफ्रेन्डच्या हातात हात घालून दिसली सुश्मिता सेन, दिवाळी पार्टीत अशी घेतली एन्ट्री!!

See Pics : पुन्हा बॉयफ्रेन्डच्या हातात हात घालून दिसली सुश्मिता सेन, दिवाळी पार्टीत अशी घेतली एन्ट्री!!

सध्या बॉलिवूडमध्ये नव-नव्या जोडप्यांच्या प्रेमाची चर्चा आहे. अशीच एक जोडी म्हणजे सुश्मिता सेन व तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल. होय, सध्या सुश्मिता बिनधास्तपणे स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या या बॉयफ्रेन्डसोबत हातात हात घालून फिरतेय. अगदी अलीकडे शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत हे कथित कपल एकत्र दिसले. दोघांनीही मीडियाला अगदी बेधडक पोज दिल्या होत्या. आता सुश्मिता व रोहमन दोघेही प्रदीप गुहा यांच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले. दोघांनीही हातात हात घालून पार्टीत एन्ट्री घेतली.

यावेळी दोघांचीही केमिस्ट्री बघण्यासारखी होती.

२७ वर्षांचा रोहमन काही वर्षांपूर्वी मुंबईत शिफ्ट झाला आणि फार कमी वेळात देशातील लीडिंग फॅशन शोजमधील ओळखीचा चेहरा झाला. सध्या रोहमन फॅशन इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे.

४२ वर्षांची सुश्मिता रोहमनच्या प्रेमात आहे आणि हे रिलेशनशिप तिने जवळपास कन्फर्म केले आहे. रोहमनने सुश्मिताचं नाही तर तिच्या दोन्ही मुलींचीही मने जिंकली आहेत. अलीकडे सुशने मुलगी रिनीसोबतचा रोहमनचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.


याआधी सुश्मिताचे नाव अनेकांशी जुळले आहे. इंडस्ट्रीत अगदी नवखी असताना सुश्मिता व विक्रम भट्ट या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. सुश्मितासाठी विक्रमने आपल्या पत्नी व मुलीलाही सोडले होते. पण इतके करूनही सुश्मिता विक्रमच्या आयुष्यात टिकली नाही. पुढे विक्रमने या रिलेशनशिपबद्दल पश्चातापही व्यक्त केला होता. विक्रमनंतर सुश्मिताच्या आयुष्यात रणदीप हुड्डाची एन्ट्री झाली. सुश्मिताची दत्तक मुलगी रेनी हिलाही रणदीप आवडायचा. पण काही वर्षांत या रिलेशनशिपचाही शेवट झाला. केवळ रणदीपचं नाही तर, वसीम अकरम, बंटी सचदेवा, संजय नारंग, बिल्डर इम्तियाज खत्री यांच्यासोबतही सुश्मिताचे नाव जोडले गेले. यानंतर सुश्मिता आणि रितिक भसीन या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यात. पण अलीकडे दोघांचे ब्रेकअप झाले.

Web Title: See Pics: sushmita sen again walks hand in hand with rumoured boyfriend rohman shawl