See Pics : ‘या’ साप्ताहिकाच्या कव्हर पेजसाठी सोनम कपूरने केले बोल्ड फोटोशूट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2017 19:31 IST2017-06-04T14:01:12+5:302017-06-04T19:31:12+5:30
आपल्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. अर्थातच यावेळेसही ती तिच्या ग्लॅमरस लुकमुळेच चर्चेत ...

See Pics : ‘या’ साप्ताहिकाच्या कव्हर पेजसाठी सोनम कपूरने केले बोल्ड फोटोशूट!
आ ल्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. अर्थातच यावेळेसही ती तिच्या ग्लॅमरस लुकमुळेच चर्चेत आली आहे. सोनमने एका साप्ताहिकाच्या कव्हर पेजसाठी बोल्ड फोटोशूट केले असून, त्यामधील सोनमचा अंदाज घायाळ करणारा आहे. फोटोंमधील सोनमच्या अदा बोल्डनेसला तडका लावणाºया असल्याने सध्या सोशल मीडियावर तिचा डंका चांगलाच वाजत आहे.
![]()
![]()
‘वोग’ या साप्ताहिकाच्या जून महिन्याच्या कव्हर पेजसाठी हे फोटोशूट करण्यात आले आहे. सोनम नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. कुठलाही इव्हेंट असो वा पार्टी, सोनम काहीतरी हटके फॅशन करून उपस्थितांच्या नजरा स्वत:कडे वळवित असते. या फोटोंमध्ये सोनमचा असाच काहीसा अंदाज बघावयास मिळत आहे. फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून, तिच्या अदा घायाळ करणाºया आहेत.
![]()
![]()
काही दिवसांपूर्वीच सोनम कांस फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. रेड कार्पेटवर आपल्या खास अंदाजात केलेल्या एंट्रीमुळे सोनमचे सर्वत्र कौतुकही केले होते. शिवाय तिच्या फॅशन सेन्सचा नमुना याठिकाणीही बघावयास मिळाला होता. दरम्यान, सोनमने केलेले फोटोशूट सध्या चर्चेत असून, त्यातील काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
![]()
![]()
सोनमच्या चाहत्यांकडून तिच्या या फोटोंना पसंती दिली जात असून, तिच्या फॅशन सेन्सचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे. सोनमने ‘नीरजा’ या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारली होती. त्याकरिता तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यातही आले होते. आता ती करिना कपूर-खानबरोबर ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे.