SEE PICS : ब्रोकेड गाऊन सांभाळता सांभाळता शिल्पा शेट्टीच्या आले नाकीनऊ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 10:58 IST2017-07-30T05:28:35+5:302017-07-30T10:58:35+5:30
दिल्लीतील एका फॅशन वीकमध्ये ब्रोकेड गाऊन परिधान करून रॅम्पवर उतरणे अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी चांगलेच अडचणीचे ठरले. या फॅशन शोमध्ये ...

SEE PICS : ब्रोकेड गाऊन सांभाळता सांभाळता शिल्पा शेट्टीच्या आले नाकीनऊ!
द ल्लीतील एका फॅशन वीकमध्ये ब्रोकेड गाऊन परिधान करून रॅम्पवर उतरणे अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी चांगलेच अडचणीचे ठरले. या फॅशन शोमध्ये शिल्पा ‘शो स्टॉपर’ होती. लाल रेशमी वस्त्राने बनलेल्या ब्रोकेड गाऊनमध्ये शिल्पाने जणू रॅम्पवर आग लावली. पण डिझाईनर मोनीषा जयसिंह हिने डिझाईन केलेला हा गाऊन अंगावर चढवून रॅम्पवर चालणे इतके सोपी नव्हतेच. गाऊन बराच लांब होता. त्यामुळे रॅम्पवॉकदरम्यान तो अनेकदा शिल्पाच्या सँडलमध्ये अडकला.
![]()
![]()
यादरम्यान मोनीषाला बसून शिल्पाचा गाऊन अॅडजस्ट करावा लागला. कसे बसे शिल्पाने स्वत:ला सावरत आणि ओठांवरचे हसू फुलवत हा रॅम्पवॉक पूर्ण केला. या गाऊनमध्ये शिल्पा अतिशय सुंदर दिसत होती, हे सांगायला नकोच. पण हाच गाऊन सांभाळता सांभाळता तिच्या नाकीनऊ आले, हे मात्र तेवढेच नक्की. विश्वास बसत नसेल तर शिल्पाच्या या रॅम्पवॉकचे फोटो तुम्हीही बघाच.
ALSO READ ; शिल्पा शेट्टीला वियानने म्हटले ‘सिली मम्मा’
फिटनेस आणि आपल्या स्टाईलिश अंदाजासाठी ओळखणा-या शिल्पाने यावेळी एक प्रांजळ कबुलीही दिली. होय, मी माझ्या करिअरमध्ये खूप चुका केल्या. पण या चुकांमधून व्यक्ती शिकते आणि हाच अनुभव तुम्हाला समृद्ध बनवत जातो. हा अनुभव खरेदी केल्या जावू शकत नाही. मी माझ्या चुकांमधून शिकले, याचा मला अभिमान आहे. मी अनेक चुका केल्यात आणि यातून शिकले, हे सांगण्यात मला कुठलीही लाज वाटत नाही, असे शिल्पा यावेळी म्हणाली.
शिल्पा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. अलीकडे शिल्पाने तिची वेबसाईटही लॉन्च केली. शिल्पाच्या या वेबसाईटमध्ये आॅर्ट आॅफ लिव्हिंग फूड, द आर्ट आॅफ स्ट्रेदनिंग, द आर्ट आॅफ बॅलेन्स योगा सीरिज अशा तीन सेगमेंट आहेत.