SEE PICS : पहा राणी मुखर्जीच्या चिमुकल्या आदिराची झलक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 18:05 IST2017-06-17T12:35:25+5:302017-06-17T18:05:25+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडा यांची लाडकी आदिरा हिची अद्यापपर्यंत हवी तशी झलक चाहत्यांना बघावयास मिळाली ...

SEE PICS: See Rani Mukherjee's tweezers! | SEE PICS : पहा राणी मुखर्जीच्या चिमुकल्या आदिराची झलक!

SEE PICS : पहा राणी मुखर्जीच्या चिमुकल्या आदिराची झलक!

लिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडा यांची लाडकी आदिरा हिची अद्यापपर्यंत हवी तशी झलक चाहत्यांना बघावयास मिळाली नाही. मात्र आज आम्ही राणीच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण करणार असून, आदिराची स्पष्ट झलक दिसेल असे तिचे काही निवडक छायाचित्रं तुम्हाला दाखविणार आहोत. वास्तविक राणी आणि आदित्य आदिराला घेऊन नेहमीच प्रोटेक्टिव्ह राहिले आहेत. हे दाम्पत्य मीडियापासून आदिराला नेहमीच लपवित आले आहेत. त्यांनी असे का केले असावे याचे कारण त्या दोघांनाच माहीत असेल. परंतु आज राणीच्या या लाडकीची झलक बघावयास मिळाली आहे. 





त्याचे झाले असे की, राणी आणि आदिरा या दोघी विमानतळावर स्पॉट झाले असून, कॅज्युअल अंदाजात असलेली राणी खूपच सुंदर दिसत होती. जेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधीला राणी दिसली तेव्हा तिची एक छबी टिपण्यासाठी लगेचच कॅमेरे तिच्याकडे वळले. परंतु राणीने कॅमेरामन यांना, ‘फोटो क्लिक करताना फ्लॅशचा वापर करू नका’ असे सांगत आदिराचे काही फोटो क्लिक करण्यास परवानगी दिली. राणीने फ्लॅश बंद करण्याचा आग्रह याकरिता धरला की आदिराची सेफ्टीकडे लक्ष दिले जावे. 





असो, राणी जेव्हा कॅमेºयासमोर आली तेव्हा तिच्या चेहºयावर हास्य आणखीनच खुलत होते. प्रत्येक फोटोत तिचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. कारण ती खूपच सुंदर दिसत होती. काही दिवसांपूर्वीच राणीचे काही फोटो समोर आले होते. फोटोमध्ये राणीला ओळखणे अवघड होते. मात्र आता समोर आलेल्या फोटोमध्ये राणी खूपच सुंदर दिसत असून, पडद्यावर जशी दिसत होती अगदी त्याच अंदाजात राणी कॅमेºयात कैद झाली. 





राणीने ग्रे रंगाचा जम्पर आणि लाल रंगाची पॅण्ट घातली होती, तर आदिरा गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये बघावयास मिळाली. आदिरा आणि राणीचे फोटो एवढे सुंदर आहेत की, तुम्हालाही राणी आणि आदिराचा हा अंदाज आवडेल. 

Web Title: SEE PICS: See Rani Mukherjee's tweezers!