Priyanka Nick Wedding: प्रियांका व निकचे जोधपूर विमानतळावर शाही स्वागत, पाहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 13:40 IST2018-11-29T13:32:55+5:302018-11-29T13:40:21+5:30

गुरुवारी सकाळी निकयांका जोधपूर विमानतळावर पोहोचले आणि त्यांना पाहून चाहते आणि मीडियाने एकच गर्दी केली.क्रेजी चाहत्यांनी प्रियांकाचे जोरदार स्वागत केले.

SEE PICS: Priyanka Nick Wedding: nickyanka at jodhpur airport, see photo !! | Priyanka Nick Wedding: प्रियांका व निकचे जोधपूर विमानतळावर शाही स्वागत, पाहा फोटो!!

Priyanka Nick Wedding: प्रियांका व निकचे जोधपूर विमानतळावर शाही स्वागत, पाहा फोटो!!

ठळक मुद्देहे स्वागत पाहून प्रियांका व निक दोघेही भारावले. दोघांनीही हात जोडून अभिवादन करत चाहत्यांचे आभार मानलेत.

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा येत्या २ डिसेंबरला अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. काल प्रियांकाच्या घरी गणेश पुजा झाली आणि पाठोपाठ आज प्रियांका व निक आपआपल्या कुटुंबासोबत जोधपूरला पोहोचले. गुरुवारी सकाळी निकयांका जोधपूर विमानतळावर पोहोचले आणि त्यांना पाहून चाहते आणि मीडियाने एकच गर्दी केली. क्रेजी चाहत्यांनी प्रियांकाचे जोरदार स्वागत केले.

हे स्वागत पाहून प्रियांका व निक दोघेही भारावले. दोघांनीही हात जोडून अभिवादन करत चाहत्यांचे आभार मानलेत.

 

या लग्नात सामील होण्यासाठी निक जोनासचा भाऊ जो जोनास आणि त्याची पार्टनर सोफी टर्नर हे दोघेही जोधपूरला पोहोचले.

निकचा आणखी दुसरा भाऊ केविन जोनास आण त्याची पत्नी डेनिअल जोनास हे दोघेही जोधपूरला पोहोचलेत.

प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्रा ही सुद्धा जोधपूरला पोहोचली.

येत्या २ डिसेंबरला प्रियांका व निकचे शुभमंगल आहे. तत्पूर्वी आज प्रियांकाच्या हातांवर निकच्या नावाची मेहंदी सजणार आहे. 

यानंतर संगीत सेरेमनी होणार आहे. जोधपूरमध्ये हे सगळे कार्यक्रम शाही अंदाजात होणार, हे नव्याने सांगणे नकोच.प्राप्त माहितीनुसार, संगीत सेरेमनीत प्रियांका तिची आई मधू चोप्रा हिच्यासोबत डान्स परफॉर्मन्स देणार आहे. प्रियांकाच्या लग्नाला काही इंटरनॅशनल स्टार हजेरी लावणार असल्याचीही खबर आहे. या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र तेवढेचं उपस्थित राहणार आहेत. सुमारे ८० लोकांच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे.   वेडिंग वेन्यूपर्यंत प्रियांका व निक दोघेही हेलिकॉप्टरने पोहोचणार आहेत. लग्नाचे वºहाडीही जोधपूर एअरपोर्टवरून हेलिकॉप्टरनेच थेट वेडिंग मेन्यूपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे उमेद पॅलेसमध्ये एक हेलिपॅड उभारण्यात येत आहे.  

Web Title: SEE PICS: Priyanka Nick Wedding: nickyanka at jodhpur airport, see photo !!