SEE PICS : आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर रंगला ‘या’ कपलचा रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 12:01 IST2019-09-03T12:01:26+5:302019-09-03T12:01:59+5:30

 किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. या शिखरावर कपलने एकमेकांना किस केले आणि...

SEE PICS: milind soman kisses wife ankita konwar on mt kilimanjaro viral photos | SEE PICS : आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर रंगला ‘या’ कपलचा रोमान्स

SEE PICS : आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर रंगला ‘या’ कपलचा रोमान्स

ठळक मुद्दे  प्रेमामध्ये वय कधीच आडवं येत नाही हे दाखवत मिलिंद आणि अंकिता गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लग्नबंधात अडकले होते.

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर या कपलची रोमॅन्टिक केमिस्ट्री कायम चर्चेचा विषय ठरते. नुकताच अंकिताचा वाढदिवस झाला. मिलिंदने आफ्रिकेतील किलीमांजारो या सर्वोच्च शिखरावर अंकिताचा वाढदिवस साजरा केला. या खास सेलिब्रेशनचे फोटो दोघांनी शेअर केले आहेत.
 किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. मिलिंद व अंकिताने हे शिखर सर केले. केवळ इतकेच नाही तर या शिखरावर पाऊल ठेवल्यावर एकमेकांचे चुंबन घेत, आनंद साजरा केला. अंकिताचा वाढदिवस आणि एक सर्वोच्च शिखर सर केल्याचा आनंद अशा या दुहेरी आनंदाचे क्षण कॅमे-यात कैद झालेत.


मिलिंदने हे फोटो शेअर करत, अंकिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. ‘जंबो लोक. अंकिताचा 28 वा वाढदिवस अनेकार्थाने खास ठरला. 29 व्या वर्षातील पर्दापण शानदार राहिले. 19,341 फूट Uhuru peak वर पोहोचलो. हे आफ्रिकेचे छत आहे,’ असे त्याने लिहिले. केवळ इतकेच नाही तर ‘माझ्या मते, आसामच्या महिलेने पहिल्यांदा हे शिखर सर केले. मला तुझा अभिमान आहे, स्वीट हार्ट. तू खूप लोकांना प्रेरणा दिलीस,’असेही त्याने लिहिले.


अंकिताने मिलिंदच्या पोस्टला उत्तर देत लिहिले,‘हे तुझ्याशिवाय अशक्य असते. मला सोबत दिल्याबद्दल आभार... मी लहान होते तेव्हा नेहमी टार्जनबद्दल विचार करायचे. त्याच्यासारखेच मला जगायचे होते. कायम स्वतंत्र. मी खूप आनंदी आहे की, मला तुझ्यासारखा पार्टनर मिळाला.’


  प्रेमामध्ये वय कधीच आडवं येत नाही हे दाखवत मिलिंद आणि अंकिता गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लग्नबंधात अडकले होते. मिलिंद अंकितापेक्षा तब्बल 26 वर्षांनी मोठा असूनही अंकिताने लग्नाला होकार दिला होता. याआधी मिलिंदने 2006 मध्ये अभिनेत्री मिलिन जैम्पेनोईसोबत लग्न केले होते. पण अवघ्या तीन वर्षातच ते वेगळे झाले होते.

Web Title: SEE PICS: milind soman kisses wife ankita konwar on mt kilimanjaro viral photos