SEE PICS : ‘या’ तरुणीच्या बॉलिवूड एंट्रीने अभिनेत्रींमध्ये धास्ती, कोण आहे बरं ही तरुणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 17:38 IST2017-08-06T12:08:52+5:302017-08-06T17:38:52+5:30
सध्या इंटरनेटवर एका तरुणीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ही मुलगी हैदराबाद येथील रहिवासी असून, तिचे नाव सपना ...
SEE PICS : ‘या’ तरुणीच्या बॉलिवूड एंट्रीने अभिनेत्रींमध्ये धास्ती, कोण आहे बरं ही तरुणी?
स ्या इंटरनेटवर एका तरुणीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ही मुलगी हैदराबाद येथील रहिवासी असून, तिचे नाव सपना व्यास- पटेल असे आहे. सपनाचे फोटो व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे तिचे सौंदर्य आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर सपनाचा असा काही जलवा आहे की, नेटिझन्स तिच्या फोटोची एक झलक बघण्यास अक्षरश: आतुर असतात. सपना एक फिटनेस ट्रेनर असून, मॉडलिंगमध्येही नशीब आजमावत आहे. तिला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे असून, असे झाल्यास बहुतांश अभिनेत्रींना तिची धडकी भरेल यात शंका नाही.
![]()
![]()
![]()
सपनाचा जन्म १० नोव्हेंबर १९८९ मध्ये झाला. ती गुजरातचे आरोग्यमंत्री जय नारायण व्यास यांची मुलगी आहे. सपनाने तिचे प्रारंभिक शिक्षण अहमदाबाद येथे केले. पुढे तिने इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट निरमा युनिव्हर्सिटी येथे एमबीए केले. त्यानंतर तिने लाइफस्टाइल ब्रॅण्ड मॅनेजमेंटमध्ये पीएचडी केली. सपनाचा फिटनेस आणि सौंदर्यं बघून ती कोण्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, असेच दिसते.
![]()
![]()
![]()
![]()
मीडिया रिपोटर््सनुसार सुरुवातीच्या काळात सपनाचे वजन खूप जास्त होते. त्यामुळे लोक तिला चिडवत होते. त्यामुळेच तिने वजन कमी करण्याचा निश्चिय केला. तिने डायट कंट्रोल करताना कार्डिओ एक्सरसाइज आणि टेनिस खेळावर फोकस केले. याचा तिला वजन कमी करण्यास खूप फायदा झाला. वृत्तानुसार सपना सध्या बॉलिवूड डेब्यूची तयारी करीत असून, अनेक निर्माते तिच्या संपर्कात आहेत. शिवाय ती बॉलिवूडमध्ये येणार या विचाराने काही बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या मनात भीतीही निर्माण झाली आहे.
![]()
![]()
![]()
![]()
सपनाचा लूक दिव्या भारतीशी साम्य साधणारा असल्याने बॉलिवूडमध्ये हा चेहरा निर्मात्यांचा पसंतीचा ठरेल असेच काहीसे दिसत आहे. सपना खूपच कष्टाळू आहे. अशात जर तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली तर, सुंदरता आणि मेहनतीच्या जोरावर ती इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण करेल, असे जाणकारांकडून बोलले जात आहे.