See Pics : ‘बाहुबली-२’ला ‘या’ सीन्समुळेच मिळाले अफाट यश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 19:26 IST2017-05-24T13:43:18+5:302017-05-24T19:26:36+5:30
आतापर्यंत सोळाशे कोटी रुपयांचा बिझिनेस करून इंडस्ट्रीमधील सर्व रेकॉर्ड ब्रेक करणाºया ‘बाहुबली-२’ने इतिहास रचला आहे; मात्र या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमधील ...

See Pics : ‘बाहुबली-२’ला ‘या’ सीन्समुळेच मिळाले अफाट यश!
आ ापर्यंत सोळाशे कोटी रुपयांचा बिझिनेस करून इंडस्ट्रीमधील सर्व रेकॉर्ड ब्रेक करणाºया ‘बाहुबली-२’ने इतिहास रचला आहे; मात्र या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमधील क्रेझ अजूनही कमी झालेली नसल्याने हा चित्रपट दोन हजार कोटी रुपयांचा आकडा गाठेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. चित्रपटाला हे अफाट यश कशामुळे मिळाले हा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. याचे उत्तर आम्ही चित्रपटाच्या अफाट अशाला कारणीभूत असलेल्या सीन्सच्या छायाचित्रांच्या स्वरूपात तुम्हाला सांगणार आहोत.
![]()
![]()
![]()
![]()
अभिनेता प्रभास स्टारर या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. चित्रपटातील प्रत्येक सीन्समध्ये विविधता असून, हे सीन्स चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यास मदत करतात. प्रभास, राणा डग्गुबाती, रमैया कृष्णन, नासिर, सत्यराज, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया यांनी खूपच दमदार भूमिका साकारून चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळवून दिली आहे. २८ एप्रिलला रिलीज झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे.
![]()
![]()
![]()
![]()
एस. एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच्या प्रत्येक सीन्सची निर्मिती विचारपूर्वक केली आहे. अशातही काही सीन्स असे आहेत, जे या चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळवून देतात. राजा अमरेंद्र बाहुबली, भल्लालदेव, कटप्पा, शिवगामी, अवंतिका, देवसेना, बिज्जलदेव हे सर्वच पात्र स्मरणात राहणारे आहेत.
![]()
![]()
![]()
![]()
त्याव्यतिरिक्त चित्रपटातील काही दृश्य कधीच विसरता येत नाही. जसे की, राजमाता शिवगामीच्या तोंडून ‘महेंद्र बाहुबली’ ही घोषणा असो वा बाहुबली, भल्लालदेवमधील तुफान युद्धाचे प्रसंग असो हे सर्वच दृश्य आजही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतात. असो, आम्ही चित्रपटातील असेच काही दृश्य तुम्हाला छायाचित्र स्वरूपात दाखवित आहोत.