SEE PICS : ​एक क्षणही अभिषेकला दूर करायला तयार नव्हती ऐश्वर्या राय बच्चन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 15:19 IST2017-12-25T09:49:51+5:302017-12-25T15:19:51+5:30

काल रात्री बंटी वालियाच्या बर्थ डे सेलिब्रेशनला बॉलिवूडच्या अनेकांनी हजेरी लावली. पण यात सर्वांच्या नजरा खिळल्या त्या ऐश्वर्या राय ...

SEE PICS: Aishwarya Rai Bachchan was not ready to remove Abhishek at a moment !! | SEE PICS : ​एक क्षणही अभिषेकला दूर करायला तयार नव्हती ऐश्वर्या राय बच्चन!!

SEE PICS : ​एक क्षणही अभिषेकला दूर करायला तयार नव्हती ऐश्वर्या राय बच्चन!!

ल रात्री बंटी वालियाच्या बर्थ डे सेलिब्रेशनला बॉलिवूडच्या अनेकांनी हजेरी लावली. पण यात सर्वांच्या नजरा खिळल्या त्या ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर. होय, कारणही तसेच खास होते. यापूर्वी कधीही दिसले नाही असे चित्र यावेळी दिसले. खरे तर अभिषेक व ऐश्वर्या हे दोघेही म्हणजे ‘मेड फॉर इच अदर कपल’. या दोघांवरून तशाही नजरा हटत नाहीत. कालही असेच झाले. पण त्याचे कारण वेगळे होते. हे कारण म्हणजे, ऐश्वर्याला आपल्या हबीला एक क्षणही दूर करायला तयार नव्हती.



होय, या कपलने पार्टीत एन्ट्री केली तेव्हा ऐश्वर्याने अभिषेकच्या हाताला घट्ट पकडले होते. यानंतर तर अभिषेक अधिकाधिक जवळ राहावा, यासाठी ऐश्वर्या प्रयत्न करताना दिसली.



याआधी बहुतेकदा अभिषेकचं ऐश्वर्याचा हात पकडून दिसायचा. पण काल पहिल्यांदा ऐश्वर्या अभिषेकला कवटाळून दिसली.



याचे काही फोटो आमच्या हाती लागले आहे. हे फोटो बघता, काल ऐश्वर्या भलतीच मूडमध्ये होती, असे दिसतेय. या पार्टीत रणबीर कपूरही अभि-ऐशसोबत दिसला. तिघेही एकमेकांसोबत धम्माल मस्ती करताना दिसले. पण या धम्माल मस्तीतही अभि-ऐश आपल्याच तालात दिसले.अभिषेक व ऐश्वर्या लवकरच एकत्र दिसणार असल्याची खबर आहे. कदाचित रिअल आयुष्यातील खरीखुरी केमिस्ट्री रिल आयुष्यात दिसावी, असा अभि-ऐशचा प्रयत्न असावा. 



ALSO READ : ​सलमान खानची एक्स-मॅनेजर करणार ऐश्वर्या राय बच्चनसाठी काम!!

सध्या अभिषेकचे करिअर डामाडौल दिसतेय. याचमुळे ऐश्वर्या राय बच्चनने म्हणे सलमान खानची पूर्वाश्रमीची मॅनेरज रेशमा शेट्टी हिला कामावर ठेवले आहे. काल-परवापासून बॉलिवूडमध्ये याचीच चर्चा रंगली आहे.  अभिषेकचे करिअर गटांगळ्या खात आहे, हे सगळेच जाणतात. त्यामुळे यास्थितीत अभिषेकच्या करिअरला टेकू देणे अतिशय गरजेचे आहे. ऐश्वर्याने म्हणे, हिच गरज ओळखून रेशमा शेट्टी हिला कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: SEE PICS: Aishwarya Rai Bachchan was not ready to remove Abhishek at a moment !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.