SEE PIC : विक्रम प्रभूच्या मुलाला प्रभासने दिले ‘बाहुबली’ गिफ्ट; काय असेल बरं हे गिफ्ट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 18:33 IST2017-09-10T13:03:12+5:302017-09-10T18:33:23+5:30
प्रभासने विक्रम प्रभूच्या मुलाच्या बर्थ-डेला ‘बाहुबली’ची तलवार गिफ्ट केली आहे. पहा फोटो!
.jpg)
SEE PIC : विक्रम प्रभूच्या मुलाला प्रभासने दिले ‘बाहुबली’ गिफ्ट; काय असेल बरं हे गिफ्ट?
ए एस राजामौली यांच्या ‘बाहुबली’च्या प्रचंड यशानंतर अभिनेता प्रभास मुलांसाठी जणूकाही सुपर हीरो झाला आहे. याचा प्रत्यय तेव्हा आला जेव्हा प्रभासने विक्रम प्रभूचा मुलगा विराटला त्याच्या बर्थ-डेवर एक स्पेशल आणि तेही ‘बाहुबली’ गिफ्ट दिले. प्रभासने ‘बाहुबली’मधील त्याची तलवार ‘रेप्लिका’ (प्रतिकृती) विराटला गिफ्ट म्हणून दिली. प्रभासच्या या गिफ्टमुळे आनंदी झालेल्या विक्रमने तलवारीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून प्रभासचे आभार मानले. यावेळी विराटने ‘बाहुबली’ स्टारला स्वीटेस्ट पर्सन असे म्हटले.
विक्रमचा नुकताच ‘नेरूपपुडा’ हा चित्रपट रिलीज झाला असून, त्यास चाहत्यांनी सरासरी प्रतिसाद दिला आहे. तर प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट तीन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. असे म्हटले जात आहे की, प्रभासने ‘साहो’साठी त्याचे मानधन वाढविले आहे. ‘बाहुबली-२’साठी प्रभासने २० ते २५ कोटी रुपये मानधन घेतले होते. मात्र आता तो त्याच्या आगामी ‘साहो’साठी ३० कोटी रुपये घेणार असल्याचे समजते. बॉलिवूडमधील तिन्ही खान ३० कोटी रुपयांपेक्षाही अधिक मानधन घेतात.
दरम्यान, प्रभासच्या ‘साहो’मध्ये बॉलिवूडमधील बºयाचशा कलाकारांचा समावेश आहे. चित्रपटातील मुख्य खलनायकाच्या भूमिके नील नितीन मुकेश आणि चंकी पांडे बघावयास मिळणार आहेत. एक सूत्राने मिड डेला दिलेल्या माहितीनुसार, ‘साहो’मध्ये तीन खलनायक असतील. ज्यामध्ये चंकी पांडेची भूमिका डार्क असणार आहे. नीलही दमदार खलनायकाच्या भूमिकेत असेल. तर जॅकी श्रॉफ सौम्य आणि कूल असलेला खलनायक असणार आहे.
सध्या या चित्रपटाची हैदराबाद येथे शूटिंग सुरू आहे. पुढच्या आठवड्यात जॅकी चित्रपटातील इतर स्टारकास्टला ज्वॉईन करणार आहे. त्याचबरोबर प्रभाससोबत पहिल्यांदाच या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे.