See Photos : भारतच्या रिलीजपूर्वीच कॅटरिना कैफने खरेदी केली न्यू ब्रँड कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 17:39 IST2019-05-05T17:34:27+5:302019-05-05T17:39:18+5:30

बॉलिवूडची बार्बी गर्ल कॅटरिना कैफ ही दिसणार आहे.  कुमुद रैना ही व्यक्तिरेखा ती साकारणार असून बऱ्याच दिवसांपासून ती या चित्रपटामुळे चर्चेत आलीय. आता मात्र ती एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिने चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच  न्यू ब्रँड कार खरेदी केली आहे. तिने सोशल मीडियावर कारसोबतचा फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने फोटो अपलोड करून त्याला ‘मोदी मोटर्स जैगुआर लैंड रोवर वर्ली कार या अप्रतिम अनुभवासाठी थँक्यू’ तुम्हाला तर ठाऊक आहेच की, कॅटला महागड्या खरेदी करायचा छंदच आहे.

See Photos: Katrina Kaif bought a brand new car before India's release! | See Photos : भारतच्या रिलीजपूर्वीच कॅटरिना कैफने खरेदी केली न्यू ब्रँड कार

See Photos : भारतच्या रिलीजपूर्वीच कॅटरिना कैफने खरेदी केली न्यू ब्रँड कार

बहुचर्चित ‘भारत’ चित्रपटात बॉलिवूडची बार्बी गर्ल कॅटरिना कैफ ही दिसणार आहे.  कुमुद रैना ही व्यक्तिरेखा ती साकारणार असून बऱ्याच दिवसांपासून ती या चित्रपटामुळे चर्चेत आलीय. आता मात्र ती एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिने चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच  न्यू ब्रँड कार खरेदी केली आहे. तिने सोशल मीडियावर कारसोबतचा फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने फोटो अपलोड करून त्याला ‘मोदी मोटर्स जैगुआर लैंड रोवर वर्ली कार या अप्रतिम अनुभवासाठी थँक्यू’ तुम्हाला तर ठाऊक आहेच की, कॅटला महागड्या खरेदी करायचा छंदच आहे. यापूर्वीही तिच्या ऑडी  कार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी तिने रेंज रोवर कार खरेदी केली होती. 

सुत्रांनुसार, कॅटने खरेदी केलेल्या या कारची किंमत हजारांत नसून लाखोंमध्ये आहे. भारतात ही कार ४९ लाख ते ६९ लाख एवढी मोठी रक्कम आहे. कॅटने खरेदी केलेल्या कारचे मॉडेल टॉप आहे. कॅटच्या अगोदर रॅपर बादशाहने ६ कोटींची ‘रोल्स रॉयल्स रॅथ’ कार खरेदी करून सोशल मीडियावर फोटो पोस्ट केली होता. 

कॅटरिनाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, कॅटरिना कैफ आता ‘भारत’ या आगामी चित्रपट भाईजान सलमान खानसोबत दिसणार आहे. यात दिशा पटानी, सुनील ग्रोव्हर , जॅकी श्रॉफ, तब्बू आणि नोरा फतेही हे कलाकार दिसतील. अलीकडेच चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला तेव्हा प्रेक्षकांना तो प्रचंड आवडला होता.  ५ जूनला चित्रपट रिलीज होणार आहे. कॅटरिनाच्या अगोदर ही भूमिका प्रियांका चोप्रा हिला ऑफर करण्यात आली होती. मात्र, तिच्या लग्नाच्या तारखांचा आणि चित्रपटाचा मेळ जमत नसल्याने ती या चित्रपटातून बाहेर पडली. मग ही भूमिका कॅटरिनाच्या झोळीत पडली. अशातच सलमानने तिचे चांगल्या भूमिकेसाठी कौतुक केले आहे. कमी वेळेत अतिशय उत्कृष्ट तयारी केल्याची कौतुकाची थाप तिने मिळवली आहे.

Web Title: See Photos: Katrina Kaif bought a brand new car before India's release!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.